AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागड्या पॅकचा रिचार्ज करण्याची गरज नाही! TRAI च्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा; आता फक्त कॉलिंगसाठी करता येणार रिचार्ज

इंटरनेटचा वापर न करणाऱ्या ग्राहकांना आता केवळ कॉलिंग आणि SMSसाठीचे Recharge पर्याय उपलब्ध करून देण्यावर TRAIने भर दिला आहे, त्यामुळे गरज नसलेल्या Dataसाठी पैसे खर्च करण्याचा पर्याय टाळता येऊ शकतो.

महागड्या पॅकचा रिचार्ज करण्याची गरज नाही! TRAI च्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा; आता फक्त कॉलिंगसाठी करता येणार रिचार्ज
NETWORKS Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 4:48 PM
Share

मोबाईल रिचार्ज म्हटलं की डेटा, कॉलिंग, SMS असा सगळा पॅक घ्यावा लागतो. काही लोकांना इटरनेटची गरजच नसताना देखील हा महागडे रिचार्ज करावे लागतात. त्यामुळे जवळपास दरमहिन्याला हजार रूपये रिचार्जसाठीच वेगळे काढावे लागतात. आता याच मुद्द्यावर TRAI ने ग्राहकांच्या बाजूने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्याता आहे.

फक्त कॉलिंग मग इंटरनेटचे पैसे कशाला द्यायचे

अनेक ग्राहक फक्त मोबाईलचा वापर हा कॉलिंगसाठीच करतात. पण काही पर्याय शिल्लक नसल्याने त्यांना पूर्ण पॅक मारावाच लागतो. हे रिचार्ज महागडे देखील आहेत. त्यामुळे इंटरनेट न वापरणाऱ्यांसाठी एक स्वस्त फक्त कॉलिंगसाठी रिचार्ज असावा अशी अनेक ग्राहकांची मागणी आहे.TRAI ने या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार रिचार्ज उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.

Jio- Airtel- Vi- BSNL ला बदलावे लागणार पॅकेज प्लॅन

TRAI ने जाहीर केलेल्या आदेशानुसार टेलिकॉम कंपन्याना कॉलिंग आणि SMS साठी विशेष वाउचर उपलब्ध करुन द्यावे लागणार आहे. यामध्ये ३० दिवस किंवा त्यापेक्षा कमी वैधतेचा कॉलिंग आणि SMS पर्याय देणे आवश्यक आहे. याशिवाय दर महिन्याला रिचार्ज प्लॅन अपडेटही करता येणार आहेत.

सोप्या भाषेत सांगायच झालं तर, ज्यांना फक्त फोन करायचा आहे आणि SMS करायचा आहे, त्यांना डेटा असलेला महागडा पॅक घेण्याची सक्ती राहू नये. हा या बदलामागचा मु्ख्य उद्देश आहे.आता ग्राहकांना त्यांच्या वापरानुसार आणि बजेटनुसार रिचार्ज निवडता येईल.

हा प्लॅन केव्हा सुरू होणार

TRAI ने नवे नियम जरी जाहीर केले असले तरी नव्या प्लॅनची नेमकी किंमत किंवा प्रत्येक कंपनी हा प्लॅन कधी बाजारात आणणार याची तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही.

Follow Us
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा
Video : मालाडमध्ये कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये विराजमान बाप्पा, गणेशोत्सवाची अनोखी संकल्पना
आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा
Bhandara : आमच्या बळावर निवडून आले, अन् आता...भाजप आमदाराविरोधात कार्यकर्त्यांचा संताप
संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा
Video: संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा भव्य जिवंत देखावा, पाहून विश्वासच बसणार नाही
चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली
Video : पर्चीवर लिहून म्हणाले पुत्रप्राप्ती होणार, आता चौथीही मुलगीच झाली, धीरेंद्रशास्त्रींची भविष्यवाणी खोटी ठरली; व्हिडीओ व्हायरल!
11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
By Election : 11 जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा! 16 ऑक्टोबरला मतदान तर निकाल कधी?
युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा
Video : युपीआय शुल्कावरून पेट्रोल पंप चालक संतप्त, बंदचा इशारा