आय फीचर्स व 6500mAh बॅटरी आणि सोनी सेन्सर कॅमेऱ्यासह विवो टी5 लाइट 5G लाँच, जाणून घ्या किंमत

तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 25 हजार रुपयांपर्यंत असेल, तर विवोचा नवीन फोन, विवो टी५ लाइट ५जी फोन या किंमतीच्या रेंजमध्ये लाँच झाला आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

आय फीचर्स व 6500mAh बॅटरी आणि सोनी सेन्सर कॅमेऱ्यासह विवो टी5 लाइट 5G लाँच, जाणून घ्या किंमत
vivo phone
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 16, 2026 | 8:27 PM

विवोने नवीन विवो टी5 लाइट 5जी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत लाँच केला आहे. ज्याची किंमत 20 हजार ते 25 हजार रूपयांदरम्यान आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे डिव्हाइस तरुण ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार डिझाइन केले गेले आहे. हा नवीनतम फोन दीर्घकाळ टिकणारी बॅटरी, एआय-आधारित उत्पादकता फिचर्स आणि दैनंदिन कामे सहजपणे हाताळण्यासाठी हा फोन त्यानुसार डिझाइन करण्यात आलेला आहे. चला तर मग विवोच्या या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

Vivo T5 Lite 44W 5G ची भारतातील किंमत

हा नवीन विवो स्मार्टफोन ट्वायलाइट शॅडो आणि वेव्ह ब्लू या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटच्या 4GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 19 हजार 999 रूपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 21 हजार 999 रूपये आहे आणि 6GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 24 हजार 999 रूपये इतकी आहे. हा फोन 22 जुलै रोजी विवोच्या अधिकृत वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या सर्व पार्टनर रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

स्पर्धेच्या बाबतीत हा विवो फोन या श्रेणीतील मोटोरोला, ओप्पो, सॅमसंग आणि रियलमी यांसारख्या ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

लाँच ऑफरचा भाग म्हणून तुम्ही HDFC, SBI किंवा Axis बँकेचे कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास तुम्हाला 1 हजार 500 रूपयांची सूट मिळेल. याशिवाय तुमच्या सोयीसाठी तीन महिन्यांचा नो-कॉस्ट EMI चा पर्यायही उपलब्ध आहे. कृपया नोंद घ्या की या ऑफर्स केवळ 22 जुलैपर्यंतच वैध आहेत.

विवो टी5 लाइटची वैशिष्ट्ये

एआय फीचर्स: या फोनमध्ये एआय क्रिएशन, गूगल जेमिनी आणि एआय कॅप्शन यांसारखे एआय फीचर्स आहेत. तसेच तुम्हाला प्रायव्हेट स्पेस आणि व्हिवो डॉक मास्टर देखील मिळतात.

डिस्प्ले: या फोनमध्ये 1200 निट्स पीक ब्राइटनेस असलेला 6.74-इंचाचा एलसीडी डिस्प्ले असेल, तसेच या हँडसेटमध्ये 120 Hz रिफ्रेश रेट आणि आय प्रोटेक्शन यांसारखी वैशिष्ट्ये देखील आहेत.

बॅटरी: यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह एक पॉवरफूल 6500mAh बॅटरी उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ही बॅटरी 38 मिनिटांत 1 ते 50 टक्के चार्ज होऊ शकते. याशिवाय हा फोन रिव्हर्स वायर्ड चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 5G प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: 50-मेगापिक्सलचा IMX852 रियर कॅमेरा सेन्सर, तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलेला आहे.

Follow Us