
नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विवो कंपनीने Y सीरिजमधील आणखी दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. या मॉडेलची नावे Vivo Y50 आणि Vivo Y50m अशी आहेत. या दोन्ही फोनमध्ये 6000mAh बॅटरी, 12GB रॅम, ड्युअल कॅमेरा सेटअप, IP64 असे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्स जाणून घेऊयात.
Vivo Y50, Y50m मधील फीचर्स
विवोच्या या दोन्ही फोनमध्ये 6.74-इंचाच्या LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या दोन्ही फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच फीचर मिळते. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हे फोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटसह येतात. या फोनमध्ये 12GB LPDDR4X रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळते.
या फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी आहे, हे फोन 44 वॅट यूएसबी टाइप सी चार्जिंगला सपोर्ट करतात. या फोनच्या मागील बाजूस 13 एमपीचा सिंगल रियर कॅमेरा मिळेल, तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5 एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ, ड्युअल बँड वायफाय, आयआर ब्लास्टर, 3.5 मिमी ऑडिओ जॅक ही फीचर्स देण्यात आली आहेत.
Vivo Y50, Y50m 5G ची किंमत किती?
Vivo च्या या दोन्ही फोनमध्ये जवळजवळ सारखेच फीचर्स मिळतात. दोन्ही फोनची डिझाइनही सारखीच आहे. कंपनीने Vivo Y50 हा फोन 4GB RAM+ 128GB, 6 GB RAM+ 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12 GB RAM + 256 GB या चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. या फोनच्या 4GB RAM+ 128GB ची किंमत 14000 रुपये आहे. चर टॉप व्हेरिएंटची किंमत 27500 रुपये आहे.
Vivo Y50m हा फोन 6GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB या तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला. 6GB RAM + 128GB या फोनची किंमत 18,000 रुपये आहे. तर 12GB RAM + 256GB या टॉप व्हेरिएंटची किंमत 27,500 रुपये आहे. हे दोन्ही फोन प्लॅटिनम व्हाइट, स्काय ब्लू आणि डायमंड ब्लॅक रंग पर्यांयांमध्ये उपलब्ध आहेत.