Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

| Updated on: Dec 31, 2021 | 6:00 AM

अलीकडेच, Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या दूरसंचार कपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दरवाढीची घोषणा केली आहे. या टेलिकॉम कंपन्यांनी डेटा बेनिफिट कमी केला आहे, तर स्ट्रीमिंग बेनिफिट काढून टाकले आहेत.

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : अलीकडेच, Airtel, Jio आणि Vodafone Idea सारख्या दूरसंचार कपन्यांनी त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये दरवाढीची घोषणा केली आहे. या टेलिकॉम कंपन्यांनी डेटा बेनिफिट कमी केला आहे, तर स्ट्रीमिंग बेनिफिट काढून टाकले आहेत. प्राईम व्हिडीओ मोबाईल व्हेरियंट ऑफर देणाऱ्या एअरटेलव्यतिरिक्त, तीन खासगी दूरसंचार कंपन्या अॅप-बेस्ड स्ट्रीमिंग फायदे, तसेच त्यांच्या प्रीपेड प्लॅनसह डिस्ने+ हॉटस्टार मोबाईल व्हेरीयंटची ऑफर देत आहेत. (Vodafone Idea removes Rs 601 and Rs 701 Disney+ Hotstar prepaid recharge plans)

दरवाढीनंतर, Airtel आणि Jio ने त्यांच्या काही प्लॅन्समधून Disney+ Hotstar चे फायदे काढून टाकले आहेत आणि नंतर हे फायदे इतर प्लॅन्समध्ये जोडले आहेत. Vodafone Idea त्यांच्या दोन प्रीपेड प्लॅनमधून Disney + Hotstar फायदे कमी करणारी नवीन टेलिकॉम कंपनी बनली आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची किंमत 601 आणि 701 रुपये आहे.

601 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी 75GB डेटासह Disney+ Hotstar चा एक वर्षाचा अ‍ॅक्सेस मिळतो. 701 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 3GB डेटा दिला जात होता. या अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा देखील मिळत होती. आता, Vodafone Idea ने Disney+ Hotstar फायदे देणाऱ्या प्लॅनची किंमत अनुक्रमे 28 दिवस आणि 70 दिवसांच्या वैधतेसह 501 रुपये आणि 901 रुपये केली आहे.

Vodafone Idea च्या 3GB डेली डेटा प्लॅनची किंमत 501 रुपये आणि 901 रुपये आहे. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉल्समची सुविधा मिळते. प्लॅनची वैधता अनुक्रमे 28 दिवस आणि 70 दिवसांची आहे. या योजनेत Disney+ Hotstar अ‍ॅक्सेस मिळतो. Vi चा 3055 चा वार्षिक प्रीपेड प्लॅन आहे, जो Disney + Hotstar अ‍ॅक्सेस देखील देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि प्रतिदिन 100 SMS ची सुविधा मिळते.

एअरटेल प्रीपेड प्लॅन

एअरटेलने त्यांच्या 155 रुपयांपासून सुरू होणाऱ्या सर्व प्रीपेड प्लॅनसह प्राईम व्हिडीओ मोबाईल बेनिफिट दिले आहेत. ते आता 599 आणि 699 रुपयांच्या प्लॅनसह विशेष स्ट्रीमिंग बेनिफिट देखील देते. या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 एसएमएस तसेच 3GB डेटा मिळतो. 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन डिस्ने+ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन ऑफर करतो आणि त्याची वैधता 28 दिवस आहे. 699 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 56 दिवसांच्या वैधतेसह Amazon प्राईम मेंबरशिपची सुविधा आहे.

रिलायन्स जिओ प्रीपेड प्लॅन

Jio आता 601 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह स्ट्रीमिंग बेनिफिट्स देत आहे. प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलसह दररोज 3GB डेटा आणि दररोज 100 SMS मिळतात. हा प्लॅन अतिरिक्त 6GB डेटा आणि Disney+ Hotstar एक वर्षाच्या अ‍ॅक्सेससह येतो.

799 आणि 1066 रुपयांचे प्रीपेड प्लॅन अनुक्रमे 56 दिवस आणि 84 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा देणारे प्लॅन आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉल्स आणि 100 SMS दररोज मिळतात. दोन्ही प्लॅन्स डिस्ने + हॉटस्टार मोबाईलचा अ‍ॅक्सेस देतात. 1066 रुपयांच्या प्लॅनमध्ये Jio अॅप्सच्या अ‍ॅक्सेससह अतिरिक्त 5GB डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, Jio त्याच्या 659 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह Disney+ Hotstar बेनिफिट देखील देईल, ज्यात 56 दिवसांसाठी 1.5GB डेटा मिळेल.

इतर बातम्या

Airtel Vs JioFiber Vs BSNL: 50Mbps स्पीडसह 500 रुपयांपेक्षा स्वस्त ब्रॉडबँड प्लॅन, जाणून घ्या बेस्ट ऑप्शन्स

Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत

Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!

(Vodafone Idea removes Rs 601 and Rs 701 Disney+ Hotstar prepaid recharge plans)