Voter ID तयार करण्याची सोपी पद्धत, घर बसल्या असा करा कर्ज

| Updated on: Feb 18, 2024 | 10:58 AM

Voter ID | भारतीय निवडणुकांमध्ये मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्र हे महत्वाचे आहे. याचा उपयोग ओळखीसाठी करण्यात येतो. तुमचे मतदान ओळखपत्र हरवले अथवा खराब झाले तर तुम्ही फॉर्म 8 भरुन डुप्लिकेट वोटर आयडी कार्ड तयार करण्यासाठी अर्ज करु शकता. घरबसल्या असा करा अर्ज

Voter ID तयार करण्याची सोपी पद्धत, घर बसल्या असा करा कर्ज
Follow us on

नवी दिल्ली | 18 February 2024 : लोकसभा निवडणुका आता केव्हा पण जाहीर होतील. देशात खासदार निवडीसाठी मतदान होईल. निवडणूक आयोगाने मतदान करण्यासाठी मतदान ओळखपत्रासह इतर ओळखपत्र अनिवार्य केले आहे. त्याविना तुम्हाला लोकसभा निवडणुकीत मतदान करता येते नाही. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल तर त्यासाठी आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही. मतदान कार्ड तयार करण्यासाठी वा त्यात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक एप डाऊनलोड करावे लागेल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या मुळ पत्त्यावर, घरपोच हे नवीन वोटर कार्ड, मतदान ओळखपत्र मिळेल.

हे एप डाऊनलोड करा

ऑनलाईन मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अँड्राईड आणि iOS मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून भारतीय निवडणूक आयोगाचे Voter Helpline App डाऊनलोड करा. या एपच्या मदतीने तुम्ही ऑनलाईन मतदान ओळखपत्र आणि त्यात दुरुस्ती करु शकता.

हे सुद्धा वाचा

नवीन ओळखपत्रासाठी असा अर्ज करा

सर्वात अगोदर मोबाईलमध्ये वोटर हेल्पलाईन एप इन्स्टॉल करा. त्यानंतर एप उघडा. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक कर. त्यानंतर मतदार नोंदणीसाठी आवश्यक नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डची सविस्तर माहिती भरा. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यावर सबमिट बटणावर क्लिक करा. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर BLO कडून पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर नवीन मतदान ओळखपत्र तुम्हाला घरपोच मिळेल.

जुन्या ओळखपत्रात कशी कराल दुरुस्ती

तुम्ही वोटर हेल्पलाईन एपच्या मदतीने जुन्या मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करु शकता. त्यासाठी या एपच्या अगदी शेवटी Complain And Registration हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यामध्ये योग्य माहिती जमा करावी लागेल. ही माहिती जमा केल्यानंतर काही दिवसांत नवीन मतदान ओळखपत्र तुम्हाला घरपोच मिळेल. एप इन्टॉल करताना सर्वात आधी ते निवडणूक आयोगाचे अधिकृत एप आहे का याची खात्री करुन घ्या.