WhatsApp : तुम्ही वाचण्याआधीच व्हॉट्सअॅपवरील मॅसेज डिलीट झाला? चिंता नको, ‘या’ ट्रीकचा करा वापर

अनेक वेळा लोक व्हॉट्सअॅप किंवा इतर प्लॅटफॉर्मवर मॅसेज पाठवून डिलिट करतात. असेच मॅसेज वाचण्यात अनेकांना रस असतो. तुम्हालाही असे मेसेज वाचायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला पुढील टीप्सचा वापर करावा लागेल.

WhatsApp : तुम्ही वाचण्याआधीच व्हॉट्सअॅपवरील मॅसेज डिलीट झाला? चिंता नको, ‘या’ ट्रीकचा करा वापर
WhatsApp
Image Credit source: TV9
| Updated on: Jun 08, 2022 | 11:14 PM

मुंबई : अनेकजण व्हॉट्सअॅप (WhatsApp) किंवा इन्स्टाग्रामवर मॅसेज करून काही चुक झाल्यास तो डिलिट करतात. परंतु हा मॅसेज का डिलिट करण्यात आला आहे, त्यात नेमकं असं काय होत की तो डिलिट करण्यात आला, हे जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सूकता असतेच. त्यामुळे डिलिट केलेला मॅसेज पुन्हा कसा वाचता येईल, असा प्रश्न पडतो. यासाठी कोणतेही अधिकृत फीचर नसले तरी अँड्रॉईड (Android) युजर्स हे मॅसेज ट्रिकच्या मदतीने सहज वाचू शकतात. यात जमेची बाब म्हणजे, समोरच्या व्यक्तीला आपण त्याचे मॅसेज (Message) वाचले आहेत की नाही हे देखील कळू शकत नाही. यासाठी कोणती ट्रीक वापरावी, याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

ही आहेत वैशिष्ट्य

व्हॉट्सअॅपने काही वर्षांपूर्वी हे फीचर आपल्या प्लॅटफॉर्मवर आणले आहे. व्हॉट्सअॅपनंतर आता प्रत्येकासाठी डिलिट मॅसेजचं फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरही उपलब्ध झाले आहे. त्याच्या मदतीने युजर्स त्यांचे मॅसेज दुसर्‍या युजर्सला पाठवलेले संदेश ठराविक वेळेत डिलिट करु शकतात. यूजर्सना मॅसेज डिलिट करण्यासाठी व्हाट्‍सअपमध्ये इन-बिल्ट फीचर मिळत नाही. पूर्वी लोक यासाठी थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करायचे, पण आता याला थर्ड पार्टी अॅप्सची गरज नाही. तुमच्या स्मार्टफोनच्या फीचरच्या मदतीने तुम्ही डिलिट केलेले मॅसेज सहज वाचू शकता.

कसे वाचाल मॅसेज?

हिस्ट्रीच्या मदतीने युजर्स डिलिट केलेले मॅसेज वाचू शकतात. परंतु यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन्स ऑन करावे लागतील. याच्या मदतीने प्लॅटफॉर्मवर जो काही मॅसेज येईल, त्याची सूचना तुम्हाला मिळेल. समजा कोणीतरी तुम्हाला मॅसेज पाठवला आणि तुम्ही तो पाहण्यापूर्वी तो डिलिट केला असे तर तुम्हाला त्या मॅसेजचे नोटीफिकेशन मिळेल. मॅसेज डिलिट केल्यामुळे, तुम्ही यापुढे नोटिफिकेशनमधील मॅसेज वाचू शकणार नाही. इथे फक्त तुम्हाला एक ट्रीकचा वापर करायचा आहे. आता मॅसेज वाचण्यासाठी नोटीफिकेशन हिस्ट्री या पर्यायावर जावे लागेल. येथे यूजर्सना फोनमध्ये आलेल्या सर्व नोटिफिकेशन्सची माहिती मिळेल.

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवरील डिलिट केलेला मॅसेज वाचायचा असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये व्हॉट्सअॅपच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता सर्व व्हॉट्सअॅप नोटिफिकेशन्स तुमच्या समोर दिसतील. येथून तुम्ही डिलिट केलेला मॅसेज वाचू शकता. दरम्यान, ही ट्रीक केवळ व्हॉट्सअॅपवरच नाही तर इन्स्टाग्राम आणि इतर अॅप्सवरही काम करते.