WhatsApp वेबमध्ये व्हिडीओ कॉलचं फिचर नसलं तरीही व्हिडीओ कॉल करता येईल? जाणून घ्या सॉलिड ट्रिक

अक्षय चोरगे

|

Updated on: Dec 12, 2020 | 6:34 PM

व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असली, तरी वेब व्हर्जनमधून आतापर्यंत फेसटाईम अर्थात व्हिडीओ कॉल करता येत नाहीत.

WhatsApp वेबमध्ये व्हिडीओ कॉलचं फिचर नसलं तरीही व्हिडीओ कॉल करता येईल? जाणून घ्या सॉलिड ट्रिक
Follow us

मुंबई : व्हॉट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉल करण्याची सुविधा असली, तरी वेब व्हर्जनमधून आतापर्यंत फेसटाईम अर्थात व्हिडीओ कॉल करता येत नाहीत. कंपनी लवकरच तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेबवरही व्हिडीओ कॉल सेवा उपलब्ध करुन देणार आहे, अशा बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. परंतु अद्याप हे फिचर WhatsApp वेबमध्ये रोलआऊट करण्यात आलेलं नाही. कंपनी या फिचरवर सध्या काम करत आहे. हे फिचर कधी येणार याबाबत निश्चित कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही. परंतु हे फिचर येईपर्यंत तुम्ही काय करणार? आम्ही तुमचा हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही तुम्हाला एक असा पर्याय सांगणार आहोत, जेणेकरुन तुम्ही तुमच्या मित्रांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधू शकाल. (WhatsApp Web yet to get Video Call support: Here’s how you can do it now)

व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुम्हाला मेसेंजर रुमचा वापर करावा लागेल. ही खूप सोपी प्रक्रिया आहे, आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला फेसबुक अकाऊंटवर लॉग इन करावं लागणार नाही. मोबाईल व्हर्जनवरुन तुम्ही केवळ एका वेळी 8 जणांशी कॉन्फरन्स व्हिडीओ कॉलवर बोलू शकता. परंतु मेसेंजर रुमच्या मदतीने तुम्ही ग्रुप कॉल करु शकता, यामध्ये तुम्ही तब्बल 50 मित्रांना जोडू शकता. चला तर मग जाणून घ्या हे फिचर कसं वापरायचं. (मेसेंजर रुम फिचर वापरण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या)

WhatsApp वेबवरुन कसा कराल व्हिडीओ कॉल?

1. तुमच्या डिव्हाईसवर WhatsApp वेब ओपन करुन साईन इन/लॉग इन करा.

2. WhatsApp वेब साईन इन केल्यावर वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात तीन डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा. आता तुम्हाला क्रिएट रुम असा पर्याय दिसेल. (एकूण सात पर्याय दिसतील, त्यापैकी दुसरा पर्याय हा क्रिएट रुमचा आहे.)

3. क्रिएट रुम या पर्यायावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर ‘Continue in Messenger,’ हा पर्याय निवडा. Continue in Messenger वर क्लिक करताच तुमचं फेसबुक अकाऊंट ओपन होईल. आता फेसबुक थेट तुम्हाला रुम बनवण्याचा पर्याय देईल. आता पुन्हा एकदा क्रिएट रुमवर क्लिक करुन फेसबुकला कन्फर्मेशन द्या. व्हिडीओ कॉल करण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या मित्रयादीतील मित्रांची निवड करावी लागेल. (ज्यांना व्हिडीओ कॉल करायचा आहे, त्यांच्या नावांवर क्लिक करा)

4. आता एक लिंक क्रिएट होईल, ही लिंक तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबांतील सदस्यांना पाठवू शकता. त्यावर क्लिक करुन हे सर्वजण रुममध्ये (व्हिडीओ कॉलमध्ये) सहभागी होऊ शकतील.

इथे तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की, फेसबुक केवळ तुमचे डिटेल्स घेणार आहे. फेसबुक दुसऱ्या कोणत्याही युजर्सना त्यांचे डिटेल्स मागणार नाही, किंवा त्यांना साईन इन करण्यास सांगणार नाही, कारण ही रुम तुम्ही क्रिएट केली आहे आणि तुम्हीच त्याची लिंक शेअर केली आहे. विशेष म्हणजे मेसेंजर रुमचा वापर पीसी किंवा स्मार्टवरुन कोणीही करु शकतो.

संबंधित बातम्या

…तर तुमचेही WhatsApp चॅट लिक होऊ शकते; त्यापासून बचावासाठी ‘हे’ करा!

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

एकाच वेळी 50 जणांना व्हिडीओ कॉल, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फिचर येणार

(WhatsApp Web yet to get Video Call support: Here’s how you can do it now)

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI