जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क कोणता Phone वापरतात? उत्तर वाचून हैराण व्हाल

Elon Musk Phone : एका व्हायरल फोटोमुळे हे उघड झाले आहे की, इलॉन मस्क हे सामान्य लोक वापरतात तो फोन वापरतात. या फोनबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क कोणता Phone वापरतात? उत्तर वाचून हैराण व्हाल
Elon Musk Phone
Image Credit source: Google
| Updated on: Apr 29, 2026 | 10:48 PM

उद्योगपती इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ते नेहमीच त्यांच्या लाईफस्टाईलमुळे चर्चेत असतात. तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल की इलॉन मस्क समान्य लोक वापरतात तसा फोन वारतात की एखादा खास, कस्टम किंवा सीक्रेट फोन वापरतात? अलीकडेच या प्रश्नाचे उत्तर एका व्हायरल फोटोमधून मिळाले आहे. रिपोर्टनुसार, मस्क यांना अमेरिकेतील एका कोर्टाबाहेर पाहण्यात आले, जिथे त्यांच्या हातात एक Apple iPhone 17 Pro Max ue फोन दिसला. त्यामुळे ते हा फोन वापरत असल्याचे समोर आले आहे.

इलॉन मस्क कोणता फोन वापरतात?

समोर आलेल्या माहितीनुसार, इलॉन मस्क हे Apple चा iPhone 17 Pro Max वापरत आहेत. याद्वारे ते आपल्या सहकाऱ्यांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. महत्त्वाची बाब म्हणजे मस्क यांनी अनेकदा स्वतःचा स्मार्टफोन मार्केटमध्ये उतरण्याचे संकेत दिले होते. मात्र अद्याप याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. सध्या ते iPhone वापरत आहेत. यातून हे स्पष्ट होते की, Apple चे इकोसिस्टम अजूनही जगातील मोठ्या टेक लीडर्सना आकर्षित करत आहे.

काही दिवसांपूर्वी इलॉन मस्क यांच्या हातात Apple iPhone 17 Pro Max होता. ही केवळ अफवा नाही, तर एका फोटोमधून समोर आलेला खुलासा आहे. त्या फोटोमध्ये ते ब्लू रंगाचा iPhone 17 Pro Max वापरताना दिसले होते. काही काळापासून अशी चर्चा सुरू आहे की इलॉन त्यांच्या कंपनीचा एक स्मार्टफोन लॉन्च करू शकतात, ज्याला लोक टेस्ला फोन किंवा स्टारलिंक फोन या नावांनी ओळखतील. मात्र, मस्क यांनी स्पष्ट केले आहे की सध्या असा कोणताही फोन विकसित केला जात नाही. पण त्यांनी असेही म्हटले आहे की, भविष्यात गरज पडल्यास आजच्या स्मार्टफोन्सपेक्षा पूर्णपणे वेगळे AI आधारित डिव्हाइस तयार केले जाऊ शकते.

फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांना वाटले आश्चर्य

इलॉन मस्क यांच्या हातात iPhone असलेला फोटो समोर येताच तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. इतका मोठा टेक लीडरही सामान्य लोकांसारखाच फोन वापरतो हे जाणून अनेकांना आश्चर्य वाटले. अनेक यूजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देत म्हटले की, इतके पैसे असूनही मस्क आयफोनच वापरत आहे. दरम्यान, आगामी काळात आणखी एखादा आधुनिक फोन आला तर ते त्याचाही स्वीकार करू शकतात. तसेच त्यांची कंपनी एखाद्या खास फोनची निर्मिती करू शकते.

 

 

Follow Us