AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp विसरून जाल… आला Elon Musk चा दमदार प्लॅटफॉर्म! XChat इतके खास का?

Elon Musk XChat: एलॉन मस्क याने सोशल मीडियाच्या जगात पुन्हा एकदा बॉम्ब टाकला आहे. मॅसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अजून एक भिडू आला आहे. एक्स चॅट नावाने नवीन ॲप दाखल झाले आहे. काय आहे त्याचे खास फीचर?

WhatsApp विसरून जाल... आला Elon Musk चा दमदार प्लॅटफॉर्म! XChat इतके खास का?
एलॉन मस्क , एक्सचॅटImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 26, 2026 | 2:54 PM
Share

Elon Musk XChat: एलॉन मस्क याची कंपनी X ने एक नवीन ॲप बाजारात दाखल केले आहे. स्टँडअलोन मॅसेजिंग ॲप XChat लाँच केले आहे. सध्या हे ॲप iOS युझर्ससाठी आणण्यात आले आहे. या ॲपवर युझर्स त्यांच्या X कॉन्टॅक्ट्स सोबत चॅट करू शकतात. कॉलिंग करू शकतात. फाईल शेअर करू शकतात. मस्क हा ऑल इन वन ॲप तयार करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याने हा वेगळा डाव टाकला आहे. काय आहे या नवीन प्लॅटफर्मची वैशिष्ट्ये?

काय काय आहेत फीचर्स?

XChat मध्ये युझर्सला ताज्या दमाची फीचर्स मिळतील. यामध्ये ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंग, टेक्स्ट मॅसेजिंग, ग्रुप चॅट आणि फाईल शेअर करता येईल. याशिवाय तसेच दोघांमधील संवाद तिसऱ्याच्या हाती लागू नये यासाठी डिसॲपरिंग मॅसेज, मॅसेज एडिट आणि डिलिट असे पर्याय देण्यात आले आहे. स्क्रीनशॉट ब्लॉक करण्याचे फीचर देण्यात आले आहे. हे ॲप एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि पिन सिक्युरिटीसह येते. हे फीचर पाहता XChat थेट WhatsApp आणि Facebook Messenger ला टक्कर देणार आहे.

कोणत्या युझर्ससाठी हे ॲप?

सध्या XChat केवळ iOS युझर्ससाठी उपलब्ध आहे. लवकरच हे ॲप इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. Benji Taylor ने संकेत दिले आहे की, हे ॲप अपडेटसह लवकरच सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे येत्या काळात तुमच्याही मोबाईलमध्ये हे ॲप असेल.

ऑल इन ऑपचे खूळ मागे

एलॉन मस्क मध्यंतरी ऑल इन वन हे एव्हिरीथिंग ॲप तयार करण्याच्या विचाराने पछाडलेला होता. त्याने अनेकदा याविषयीची चर्चा केली. या ॲपमध्ये मॅसेजिंग, व्हिडिओ-ऑडिओ कॉल, पेमेंट, शॉपिंग आणि इतर अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा त्याचा प्रयत्न होता. पण त्याचे हे खूळ मागे पडल्याचे आता या नवीन ॲपने दिसून आले आहे. आता या नवीन प्लॅटफॉर्मला कितपत प्रतिसाद मिळतो हे लवकरच कळेल.

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच