
Elon Muskचे वडील एरोल मस्क भारत दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावर असताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुकही केले.तर आज या लेखातून जाणून घेऊ कि Elon Muskचे वडील नक्की काय करतात ?
जेव्हा जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध लोकांची चर्चा होते तेव्हा Elon Muskचे नाव सर्वात आधी येते. स्पेसेक्स, टेस्ला, एक्स, न्यूरालिंक सारख्या मोठ्या कंपन्यांचे मालक एलाॅन मस्क हे त्यांच्या कल्पना आणि नव-नवीन उपक्रमांसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का त्यांचे वडील कोण आहेत, ते काय करतात आणि ते किती कमावतात? चला एलाॅन मस्कचे वडील एरोल मस्कबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया, ज्या तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकल्या नसतील.
एरोल मस्क कोण आहे?
Elon Muskच्या वडिलांचे नाव एरोल मस्क आहे. ते व्यवसायाने इंजिनिअर, पायलट, प्रॉपर्टी डेव्हलपर आणि नाखवा आहेत. त्यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला आणि त्यांनी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ते फक्त इंजिनिअरच नाहीत तर ते पायलटिंग आणि सेलिंगमध्येही पारंगत आहेत. म्हणजेच, ते एक मल्टिटॅलेंटेड व्यक्ती आहेत, ज्यांनी आयुष्य जगताना अनेक क्षेत्र एक्सप्लोअर केली आहेत.
ते बातम्यांमध्ये का असतात?
एरोल मस्क बहुतेकदा फक्त Elon Muskचे वडील असल्यामुळेच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि विधानांमुळे देखील बातम्यांमध्ये असतात. अनेक वेळा त्यांनी Elon Muskच्या निर्णयांवर उघडपणे भाष्य केले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळदेखील उडाली आहे. दोघांमधील संबंध म्हणावे तसे चांगले नसले तरी, त्यांचा एकमेकांच्या जीवनावर निश्चितच परिणाम मात्र आहे.
एरोल मस्क किती कमावतात?
आता प्रत्येकाच्या मनात असलेल्या प्रश्नाबद्दल बोलूया, Elon Muskचे वडील किती कमावतात? मीडिया रिपोर्ट्सनुसार, एरोल मस्कची एकूण संपत्ती सुमारे 20 दशलक्ष डॉलर आहे असे म्हटले जाते. त्यांनी हे पैसे त्यांच्या इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्समधून, प्रॉपर्टीमधील व्यवहारांमधून आणि इतर गुंतवणुकीतून मिळवले आहेत. दक्षिण आफ्रिकेत त्यांच्याकडे अनेक घरे आणि फार्महाऊस आहेत. याशिवाय, त्यांनी सोने आणि पन्नाच्या खाणींमध्येही गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे त्यांना त्यातुन चांगला नफा मिळतो.
ते आजकाल काय करतात?
आजकाल, एरोल मस्क बहुतेक वेळा शांत जीवन जगतात, परंतु कधीकधी ते मुलाखती किंवा विधाने देऊन प्रसिद्धीच्या झोतात येतात. ते अजूनही सक्रिय आहेत आणि त्यांनी त्यांची निवृत्ती पूर्णपणे स्वीकारलेली नाही.