हिवाळ्यात तुमच्या फोनची बॅटरी झटपट संपतेय? ‘या’ सोप्या ट्रिक्सने चार्जरशिवाय तासनतास चालेल मोबाईल!

थंड हवामानाचा केवळ आपल्यावरच नाही तर, स्मार्टफोननाही अडचणींचा सामना करावा लागतो. याचा सर्वाधिक परिणाम फोनच्या बॅटरीवर दिसून येतो. अनेकदा फोनची बॅटरी वेगाने कमी होऊ लागते.

हिवाळ्यात तुमच्या फोनची बॅटरी झटपट संपतेय? ‘या’ सोप्या ट्रिक्सने चार्जरशिवाय तासनतास चालेल मोबाईल!
phone charging battery low in winter
| Updated on: Nov 27, 2026 | 2:06 PM

डिसेंबर महिना सुरू होण्याआधीच थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. थंडी वाढली की स्मार्टफोन वापरणाऱ्यांसमोर एक नवी समस्या उभी राहते. घरात असताना फोनची बॅटरी व्यवस्थित टिकते; मात्र घराबाहेर पडल्यानंतर बॅटरी झपाट्याने कमी होऊ लागते. अनेकदा बॅटरीमध्ये काही टक्के चार्ज शिल्लक असूनही फोन अचानक बंद पडतो. विशेषतः डोंगराळ भागात फिरताना किंवा बराच वेळ थंड वातावरणात राहिल्यानंतर ही समस्या अधिक जाणवते. अशा वेळी फोनची बॅटरी संपल्यामुळे महत्त्वाचे कॉल, नेव्हिगेशन किंवा इतर कामांमध्ये अडथळा येऊ शकतो. मात्र, काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास हिवाळ्यातही फोनची बॅटरी जास्त काळ टिकवता येऊ शकते.

थंडीत स्मार्टफोनची बॅटरी लवकर का संपते?

आजच्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरली जाते. कमी तापमानाचा या बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. थंडीमध्ये बॅटरीच्या आत होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया मंदावतात. त्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता तात्पुरती कमी होते आणि फोनला आवश्यक तेवढी ऊर्जा मिळण्यात अडचण येऊ शकते. यामुळे कॅमेरा वापरणे, मॅप सुरू ठेवणे किंवा स्क्रीनची ब्राइटनेस वाढवणे यांसारख्या गोष्टी करताना फोन अचानक बंद पडू शकतो. विशेष म्हणजे, थंड झालेला फोन पुन्हा उबदार वातावरणात आणल्यावर तो अनेकदा सुरू होतो.

Loading...

मात्र, अशा परिस्थितीत फोन लगेच चार्जिंगला लावणे टाळावे. फोनचे तापमान सामान्य झाल्यानंतरच चार्ज करणे योग्य ठरते.

1. फोन जॅकेटच्या आतील खिशात ठेवा

थंडीपासून फोनचे संरक्षण करणे सर्वात महत्त्वाचे आहे. फोन बराच वेळ थंड हवेत उघडा ठेवण्याऐवजी जॅकेटच्या आतील खिशात ठेवा. शरीराच्या उष्णतेमुळे फोनचे तापमान तुलनेने स्थिर राहण्यास मदत होते. बाईक किंवा स्कूटर चालवताना फोन हँडलवर लावला असेल, तर काम झाल्यानंतर तो लगेच काढून सुरक्षितपणे खिशात ठेवा.

2. घराबाहेर पडण्याआधी बॅटरी सेव्हर सुरू करा

बराच वेळ घराबाहेर राहायचे असल्यास बाहेर पडण्यापूर्वीच फोनचा Battery Saver किंवा Power Saving Mode सुरू करा. यामुळे बॅकग्राउंडमध्ये सुरू असणाऱ्या अ‍ॅप्सच्या अ‍ॅक्टिव्हिटीवर मर्यादा येते आणि बॅटरीचा वापर कमी होतो. याशिवाय स्क्रीनची ब्राइटनेस कमी ठेवा आणि स्क्रीन टाइमआउटचा कालावधीही कमी करा.

3. मॅप आणि तिकिटे आधीच डाउनलोड करून ठेवा

हिवाळ्यात फिरायला जाण्याचा किंवा एखाद्या डोंगराळ भागात प्रवास करण्याचा प्लॅन असेल, तर आधीच काही तयारी करून ठेवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us