AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या काळात डिप्रेशनमध्ये होते, मूठभर गोळ्या खायचे..; घटस्फोटानंतर मराठी अभिनेत्रीची अशी झालेली अवस्था

अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊतने पहिल्या लग्नातील कटू अनुभवांबद्दल मोठा खुलासा केला आहे. मतभेदांमुळे नैराश्य, मानसिक उपचार आणि आयुष्य संपवण्याचे विचार येत असल्याचं तिने सांगितलं.

त्या काळात डिप्रेशनमध्ये होते, मूठभर गोळ्या खायचे..; घटस्फोटानंतर मराठी अभिनेत्रीची अशी झालेली अवस्था
मराठी अभिनेत्रीचा खुलासाImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 27, 2026 | 1:54 PM
Share

मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस मराठी’मुळे ती विशेष चर्चेत आली होत. याच काळात तिने पहिल्या लग्नातील मतभेद आणि घटस्फोटाबद्दलही जाहीरपणे सांगितलं होतं. आता पहिल्या लग्नातील कठीण काळ, नैराश्य आणि टोकाचं पाऊल उचलण्याचे विचार याबद्दल तिने केलेल्या खुलाशाची चर्चा होत आहे. एका नात्यातून बाहेर पडण्यासाठी तिला किती मानसिक संघर्ष करावा लागला, याचा अनुभव तिने सांगितला आहे.

पहिल्या लग्नातील मतभेदांमुळे नैराश्याचा सामना

शर्मिष्ठा राऊत हिने अभिनेत्री अर्चना निपाणकरचा भाऊ अमेय निपाणकर याच्याशी प्रेमविवाह केला होता. दोघांनी चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केलं. त्यानंतर आठ वर्षे त्यांचा संसार सुरू होता. मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. हे मतभेद इतके वाढले की त्याचा शर्मिष्ठाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. या काळाबद्दल बोलताना शर्मिष्ठाने सांगितलं की, 2016-17 च्या आसपास ती प्रचंड तणावातून जात होती. ती नैराश्यात गेली होती आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तिला मानसिक उपचार घ्यावे लागले. त्या काळात ती मूठभर गोळ्या खात असल्याचंही तिने सांगितलं. सततच्या मानसिक त्रासामुळे तिला टोकाचं पाऊल उचलण्याचे विचारही येत होते. मात्र, या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तिने उपचारांची मदत घेतली.

घटस्फोटाचा निर्णय घेताना कुटुंबाने दिली साथ

नात्यातील सततच्या संघर्षामुळे अखेर शर्मिष्ठाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता. मात्र, तिला स्वतःचं मानसिक स्वास्थ्य आणि आयुष्य पुन्हा सावरणं महत्त्वाचं वाटत होतं. तिच्या कुटुंबीयांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबा दिला. शर्मिष्ठाने सांगितलं की, घरच्यांनी तिला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. ‘तुला वाटतंय ना, मग तू निर्णय घे. कोणी तुझ्याबद्दल विचारलं तर आम्ही सांगू की हो, आमची मुलगी परत आलीये,’ अशा शब्दांत त्यांनी तिला धीर दिला. कुटुंबाकडून मिळालेल्या या पाठिंब्यामुळे तिला कठीण काळातून बाहेर पडण्याचं बळ मिळालं.

बिग बॉसमुळे आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला

शर्मिष्ठाला या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी होण्याची संधीही महत्त्वाची ठरली. या अनुभवातून तिला स्वतःकडे नव्याने पाहता आलं. आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाला आणि नात्याला संधी द्यावी, असं तिला वाटू लागलं. त्यानंतर तिच्या आयुष्यात तेजस देसाई आला. तेजसकडून लग्नासाठी होकार होता. मात्र, पहिल्या लग्नातील अनुभव पुन्हा येऊ नयेत, यासाठी शर्मिष्ठाने घाई केली नाही. दोघांनी काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. एकमेकांचे विचार, स्वभाव आणि अपेक्षा समजून घेतल्यानंतरच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...
सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर सहकार....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेत भाजपचा एकहाती विजय; 19 पैकी 18 जागांवर भाजप प्रणित सहकार विकास पॅनलचा झेंडा
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय....
Solapur DCC Bank Result : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोहिते पाटील गटाचा पहिला विजय; अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची बाजी
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी..
NCP : संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या NCP कडून व्हिप जारी; नेमका काय आहे पक्षाचा निर्देश?