Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुस्साट इंटरनेट स्पीड पण 5G मुळे जीवसृष्टीवर संक्रांत? जाणून घ्या या तंत्रज्ञानमुळे काय बदल घडतील

दूरसंचार विभाग आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना भारतात 5G नेटवर्कच्या चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे.

सुस्साट इंटरनेट स्पीड पण 5G मुळे जीवसृष्टीवर संक्रांत? जाणून घ्या या तंत्रज्ञानमुळे काय बदल घडतील
5G technology
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 9:57 PM

नवी दिल्ली : दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) आणि भारत सरकारने टेलिकॉम सर्व्हिस प्रदात्यांना 5G चाचण्यांसाठी (5G Trials) परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळालेल्या ऑपरेटर्समध्ये भारती एअरटेल, रिलायन्स, जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एमटीएनएलचा समावेश आहे. या दूरसंचार सेवा प्रदात्यांनी (टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर्स) ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि तंत्रज्ञान प्रदात्यांसह (टेक्नोलॉजी प्रोव्हायडर्स) म्हणजेच एरिक्सन, नोकिया, सॅमसंग आणि C-DOT बरोबर भागीदारी केली आहे. त्याच वेळी, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड त्यांनी स्वत: विकसित केलेल्या तंत्रज्ञानाद्वारे ट्रायल्सची चाचणी करणार आहे. (Will 5G technology increase risk on humans and nature, what is truth)

दरम्यान, 5G Technology मुळे पक्षी, जीवजंतूंसह मानसांचा जीव धोक्यात असल्याचा दावा आतापर्यंत अनेकांनी केला आहे. त्यासंबंधीच्या बातम्या सतत्याने प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे अनेकांनी 5 जी टेस्टिंग किंवा 5 जी ट्रायल्सना विरोध केला आहे. काहीनी याविरोधात न्यायालयात दाद मागितली आहे. या सर्व दाव्यांमध्ये सत्यता किती आहे, हे जाणून घेण्याआधी 5 जी तंत्रज्ञान समजणे महत्त्वाचे आहे. 5 जी म्हणजे तंत्रज्ञानाच्या पाचव्या जनरेशनची उपलब्धी. सध्या, आपण सध्या 4G तंत्रज्ञान वापरत आहोत. अर्थात, नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजी आतापेक्षा वेगवान आणि चांगली आहे. एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचे झाल्या, 5G च्या आगमनाने आपल्याला हायस्पीड इंटरनेट मिळेल. म्हणजेच आपण सहजतेने व्हिडिओ पाहू शकताो, काहीही डाउनलोड करू शकतो, वेबसाइट पाहू शकतो आणि इंटरनेटशी संबंधित इतर गोष्टी मोठ्या वेगाने करू शकतो.

5G बाबतच्या धोक्यांविषयी भीती!

याक्षणी, 5 जी रेडिएशनबद्दल बरेच काही सांगितले जात आहे. सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की, यामुळे पक्ष्यांचा मृत्यू होईल, भारत आणि इतर देशांमध्ये सध्याच्या परिस्थितीसाठी (कोरोना संबंधित) 5G लाही जबाबदार धरले जात आहे. काही अहवालांमध्ये असे म्हटले आहे की 5G सपोर्टे़ड सेलफोन कर्करोगासारखे आजार पसरवू शकतात. काही रिसर्च पेपरमध्ये असेही म्हटले आहे की 5G टॉवर्समधून बाहेर पडणारी हाय फ्रीक्वेन्सी रेडिएशनमुळे कर्करोग, वंध्यत्व, DNA आणि मज्जासंस्थेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

पण मुळात 5 जी आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. जगभरात असे अनेक देश आहेत, ज्या देशांमध्ये अद्याप 5 जी टेस्टिंग सुरु झालेलं नाही, परंतु तिथे मोठ्या संख्येत कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला जो रेडिएशनबाबत दावा केला जात आहे, तर ती बाब तुमच्या वापरावर अवलंबून असते. त्याच वेळी, हे दावे खरे ठरवतील असे कोणतेही पुरावे कोणीही सादर करु शकलेलं नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास हे दावे नाकारण्याशिवाय पर्याय नाही.

भारतात Jio चं स्वतःचं नेटवर्क

रिलायन्स जिओने यापूर्वीच पुष्टी केली आहे की, ते एक स्वदेशी 5 जी नेटवर्क विकसित करणारर आहेत. जिओचे 5 जी नेटवर्क भारतातच विकसित केले जाईल आणि त्याचे पूर्ण लक्ष मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारतावर असेल. त्याच वेळी, एअरटेलने हैदराबादमधील व्यावसायिक नेटवर्कवरील यशस्वी 5G चाचणीची पुष्टी केली होती. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे नेटवर्क 5G तयार आहे आणि आता ते केवळ परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

ट्रायल्ससाठी 6 महिने

सध्या या ट्रायल्सचा कालावधी 6 महिन्यांचा आहे. यात उपकरणे खरेदी व स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. परवानगीमध्ये स्पष्टपणे सांगितले गेले आहे की, प्रत्येक टेलिकॉम कंपनीला शहरी सेटिंग्ज व्यतिरिक्त ग्रामीण आणि निम-शहरी सेटिंग्जमध्ये ट्रायल्स घ्याव्या लागतील. जेणेकरून देशभरातील 5 जी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल आणि हे नेटवर्क केवळ शहरी भागातच मर्यादित न राहता निम-शहरी आणि ग्रामीण भागातही पोहोचेल.

वेगवेगळ्या बँडमध्ये टेस्टिंग

टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (3.2 गीगाहर्ट्ज ते 3.67 गीगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (24.25 गीगाहर्ट्ज ते 28.5 गीगाहर्ट्ज) आणि सब-गीगाहर्ट्ज बँड (700 गीगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या 5 जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम (800 मेगाहर्ट्ज, 900 मेगाहर्ट्ज, 1800 मेगाहर्ट्ज आणि 2500 मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली आहे.

संबंधित बातम्या

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

(Will 5G technology increase risk on humans and nature, what is truth)

80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट
आरोपांचं गँग्स ऑफ वासेपूर ते सुरेश धस यांची माणूसकीची भेट.
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग
रायगड पालकमंत्रिपदाच्या वादानंतर आता खेळाच्या मैदानात राजकीय बॅटिंग.
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की...
'ऑपरेशन टायगर'मध्ये पुढचा नंबर कोणाचा? भास्कर जाधव की....
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द
'खरोखर माफ करा, पण मी वचन देते...', सुळेंनी देशमुख कुटुंबाला दिला शब्द.
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात
दादा... धनंजय मुंडेंवर ठोस भूमिका घ्या, शिंदेंच्या सेनेची सीधी बात.