फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का ? काय होणार नेमका बदल ?

1 जानेवारी पासून WhatsApp चालवण्याच्या पद्धतीत मोठा बदल होणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये SIM नसेल तर मोठी अडचण येऊ शकते असे म्हटले जात आहे.

फोनमध्ये SIM नसेल तर WhatsApp बंद होणार का ? काय होणार नेमका बदल ?
WhatsApp
| Updated on: Oct 27, 2026 | 4:41 PM

WhatsApp वर मॅसेज पाठवण्यासाठी आता फोनमध्ये तेच सिमकार्ड ठेवणे गरजेचे आहे, ज्याने तुमचे अकाऊंट बनले आहे ? दुसऱ्या फोन, टॅबलेट वा लॅपटॉपवरुन WhatsApp चालवणे पहिल्या सारखे सोपे असणार नाही ? भारतात सिम बायडिंगच्या नव्या नियमामुळे असे प्रश्न होत आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या पावलामुळे सायबर फसवणूकीवर लगाम लागेल. परंतू नव्या अभ्यासात यामुळे सर्वसामान्य लोकांना आणि छोट्या व्यापाऱ्यांना यामुळे अनेक अडचणी येतील असे म्हटले जात आहे.

बहुतांशी छोट्या व्यापाऱ्यांना भीती सतावते आहे की या नियमाने त्यांच्या रोजच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. तर अनेक लोकांना हे देखील पटत नाही की केवळ सिमला फोनशी जोडल्याने मॅसेजिंग ऐप आधी पेक्षा जास्त सुरक्षित होईल. त्यामुळे सरकारच्या या नव्या नियमांमुळे WhatsApp, Telegram आणि Signal सारखे ऐप्स चालवण्याची पद्धत कशी बदलू शकते?

Loading...

SIM बायडिंग नियम काय आहे आणि केव्हापासून लागू ?

दूरसंचार विभाग म्हणजे DoT ने नोव्हेंबर 2025 मध्ये WhatsApp, Telegram, Signal, Snapchat, Arattai, ShareChat, Josh आणि JioChat सारख्या ऐप्ससाठी सिम बायडिंगशी संबंधित निर्देश जारी केले आहेत.या ऐप्समध्ये मोबाईल क्रमांकद्वारे युजरची ओळख पटते.सरकारचे म्हणणे आहेकी काही लोक फोनमध्ये संबंधित सिम कार्ड नसतानाही या ऐप्सचा वापर करत असतात. याचा चुकीचा फायदा उठवून परदेशातून सायबर फसवणूक होऊ शकते.

नव्या नियमानुसार संबंधित ऐप्सना हे सुनिश्चित करावे लागले की अकाऊंटशी जोडलेला सक्रिय सिम त्याच फोनमध्ये उपस्थित असेल, ज्यावर ऐप्स चालवला जात आहे. सरकारने कंपन्यांना नियमाचे पालन करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंतचा वेळ दिला आहे. या हिशेबाने १ जानेवारी २०२७ पासून नव्या नियमांचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल असे म्हटले जात आहे.

याचा अर्थ हा नाही की १ जानेवारीपासून सर्व लोकांना WhatsApp अचानक बंद होईल. खरा बदल या गोष्टींवर अवलंबून असेल की ऐप्स कंपन्या नियमांना कसे लागू करतात. आणि फोनमध्ये सिमच्या उपस्थितीची माहिती कशा प्रकारे होईल.

…तर WhatsApp बंद होणार का ?

नव्या नियमांचा सर्वात थेट परिणाम त्या लोकांवर पडू शकतो. जे एका फोनमध्ये SIM ठेवतात, परंतू WhatsApp कोणा दुसऱ्या फोनवर चालवतात. उदा.जर तुमचा WhatsApp नंबर एक फोनमध्ये आहे. आणि तुम्ही त्याच नंबरने अकाऊंट दुसऱ्या अशा फोनवर चालवता, ज्यात संबंधित सिम नाही. तर नव्या नियमानुसार त्याच फोनवर ऐप्स चालवण्यासाठी अडचण येऊ शकतो.

याच प्रकारे जे लोक जुन्या फोन वा केवळ Wi-Fi ने चालणाऱ्या टॅबलेटवर मॅसेजिंग ऐप्सचा वापर करतात. त्यांना ही आपली सवय बदलावी लागू शकते. मात्र, लिंक्ड डिव्हाईसची सुविधा आणि वेग-वेगळे ऐप्सच्या नियमांना समजणे गरजेचे आहे. प्रत्येक डिव्हाईसवर ऐप्स चालवण्याची पद्धत एक सारखी नसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us