ऑनलाइन पध्दतीने विजेचे बिल भरत होती महिला, खात्यातून गायब झाले 7 लाख रूपये

| Updated on: Mar 23, 2023 | 3:55 PM

मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीच्या फोनवर थकीत वीजबिलाबाबत एसएमएस आला. तसेच, बिल न भरल्यास घराची वीज खंडित करण्यात येईल, असा इशाराही शेवटच्या संदेशात देण्यात आला होता.

ऑनलाइन पध्दतीने विजेचे बिल भरत होती महिला, खात्यातून गायब झाले 7 लाख रूपये
सायबर क्राईम
Follow us on

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime Mumbai) घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरत आहेत. एसएमएस आणि लिंकवर क्लिक करून लोक पैसे गमावत आहेत. वीजबिल भरण्याच्या नादात सात लाख रुपयांची फसवणूक झाल्याची नवीन घटना समोर आली आहे. मुंबईतील एका प्रकरणात, एका 65 वर्षीय महिलेने थकबाकी असलेल्या वीजबिलाबाबत बनावट एसएमएसला उत्तर दिल्यानंतर सायबर फसवणुकीत 7 लाख रुपयांहून अधिकचे नुकसान झाले.

काय आहे प्रकरण?

एएनआयच्या वृत्तानुसार, मुंबईतील अंधेरी भागात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीच्या फोनवर थकीत वीजबिलाबाबत एसएमएस आला. तसेच, बिल न भरल्यास घराची वीज खंडित करण्यात येईल, असा इशाराही शेवटच्या संदेशात देण्यात आला होता. पेमेंटसाठी संपर्क करण्यासाठी एसएमएसमध्ये फोन नंबरही होता.

विश्वासात घेतले

विद्युत विभागाकडून मेसेज आल्याचे महिलेला वाटल्याने तिने मेसेजवरील नंबरवर कॉल केला. एका व्यक्तीने कॉल उचलला आणि स्वत:ची ओळख अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयातील कर्मचारी म्हणून दिली. त्या व्यक्तीने पीडितेला आणखी आश्वासन दिले की तो तिला बिल भरण्यास मदत करेल आणि तिला “टीम व्ह्यूअर क्विक सपोर्ट” अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

हे सुद्धा वाचा

7 लाख रुपये तीन वेळा गेले

सूचनांचे अनुसरण करून, पीडितेने अॅप डाउनलोड केले आणि कॉलरला तिच्या मोबाइल फोनवर प्रवेश देऊन आयडी आणि पासकोड शेअर केला. काही वेळानंतर, पीडितेला 4,62,959 रुपये, 1,39,900 रुपये आणि 89,000 रुपयांच्या व्यवहाराबाबत तीन एसएमएस परत आले. त्यांच्या खात्यातून एकूण 6,91,859 रुपये काढण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तिच्या मुलीसह अंधेरी पोलिस ठाण्यात जाऊन फसवणुकीचा एफआयआर दाखल केला. पोलीस तपास करत आहेत.