अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi दमदार फोन लाँच करणार, जाणून घ्या काय असेल खास?

| Updated on: Jun 17, 2021 | 7:50 PM

Xiaomi कंपनी Mi 11 Ultra सारख्याच क्षमतेचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये अल्ट्रा-वाइड बँड (UWB) ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि एक अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असू शकेल.

अंडर डिस्प्ले कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi दमदार फोन लाँच करणार, जाणून घ्या काय असेल खास?
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन ब्रँड शाओमी (Xiaomi) Mi 11 Ultra सारख्याच क्षमतेचा फ्लॅगशिप फोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये अल्ट्रा-वाइड बँड (UWB) ट्रॅकिंग तंत्रज्ञान आणि एक अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा असू शकेल. जीएसएमअरेनाच्या अहवालानुसार, UWB आधीच Apple आणि सॅमसंगच्या लेटेस्ट फ्लॅगशिप डिव्हाईसेसमध्ये फीचर केला आहे. (Xiaomi is planning to launch new flagship smartphone with under display Camera and 120W fast charging and UWB)

सॅमसंग स्मार्टटॅग आणि Apple एअरटॅग हे तंत्रज्ञान अचूक ट्रॅकिंगसाठी अनुक्रमे गॅलेक्सी एस 21 आणि आयफोन 12 मध्ये देण्यात आलं आहे. अहवालात असे म्हटले आहे की, शाओमी कदाचित UWB -अनुकूल, ट्रॅक करण्यायोग्य अॅक्सेसरीज सादर करण्याची योजना आखत आहे.

अहवालानुसार, अलीकडील इम्प्लिमेन्टेशनमध्ये, अंडर-डिस्प्ले कॅमेरा अद्याप परफेक्ट मानला जात नाही, कारण डिस्प्ले अद्याप पारदर्शक नसल्याने या कॅमेऱ्याच्या क्षमतेबाबत संभ्रम आहे. तथापि, Google कडील अलिकडील पेटंट स्विचिंग प्रिज्म्स वापरुन हा अडथळा दूर करता येईल.

शाओमीच्या फ्लॅगशिपमध्ये Mi 11 Ultra सारखाच प्रभावी कॅमेरा सेटअप असणे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये 70W फास्ट-वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 120W वायर्ड फास्ट-चार्जिंग देखील दिले जाऊ शकते. फोन अरेनाच्या वृत्तानुसार, हे फ्लॅगशिप डिव्हाइस Mi 11 Ultra पेक्षा अधिक दमदार नसेल. परंतु ते Mi 10T सिरीजप्रमाणे असेल.

काय असेल खास?

जूनमध्ये, शाओमी इंडियाने जाहीर केले होते की, Mi 11x सीरीजच्या डिव्हाईसेस लॉन्चिंगच्या अवघ्या 45 दिवसात 300 कोटी रुपयांची विक्रमी विक्री नोंदवण्यात आली आहे. Mi 11x आणि Mi 11x Pro या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये उत्कृष्ट कॅमेरे आहेत, लेटेस्ट फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 870 आणि 888 सिरीज चिपसेट, शक्तिशाली डॉल्बी स्टीरिओ स्पीकर्स, 120 हर्ट्ज E4 सुपर एमोलेड डिस्प्ले आणि फास्ट चार्जिंग क्षमता, या सर्वांचा उद्देश प्रीमियम स्मार्टफोनचा अनुभव प्रदान करणे आहे.

इतर बातम्या

Flipkart Sale : Narzo 30 Pro, Realme X7 आणि Moto चे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदीची संधी

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

(Xiaomi is planning to launch new flagship smartphone with under display Camera and 120W fast charging and UWB)