Mi TV 5X : Xiaomi चे 3 शानदार स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत फीचर्स

| Updated on: Aug 27, 2021 | 7:51 AM

शाओमीने गुरुवारी Mi Smarter Living 2022 या मेगा इव्हेंटदरम्यान भारतात Mi TV 5X सिरीजची घोषणा केली आहे. या टीव्ही लाइनअपमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच अशा तीन वेगवेगळ्या साईजचे टीव्ही आहेत.

Mi TV 5X : Xiaomi चे 3 शानदार स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत फीचर्स
Follow us on

मुंबई : शाओमीने गुरुवारी Mi Smarter Living 2022 या मेगा इव्हेंटदरम्यान भारतात Mi TV 5X सिरीजची घोषणा केली आहे. या टीव्ही लाइनअपमध्ये 43 इंच, 50 इंच आणि 55 इंच अशा तीन वेगवेगळ्या साईजचे टीव्ही आहेत. सर्व तीन मॉडेल्स 4K रिझोल्यूशन डिस्प्ले आणि ड्युअल साउंड सिस्टमसह येतात. भारतात Mi TV 5X ची किंमत 43 इंचाच्या व्हेरिएंटसाठी 31,999 पासून सुरू होते. 50 इंच मॉडेलची किंमत 41,999 रुपये आहे, तर 55-इंच मॉडेलची किंमत 47,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. (Xiaomi launched 3 great Smart TVs of Mi TV 5X series in India, know more details)

लॉन्च ऑफरमध्ये एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डसह 3,000 रुपयांपर्यंतची सूट आणि नो-कॉस्ट EMI ऑफरचा समावेश करण्यात आला आहे. Mi India चे चीफ बिझनेस ऑफिसर रघु रेड्डी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “Mi India ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यात आघाडीवर आहे, कारण कनेक्टेड डिव्हाइसेस आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. एमआय केवळ जगातील सर्वात मोठ्या आणि वेगाने वाढणाऱ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक नाही, तर सर्वाधिक ग्राहक संख्या असलेल्या ब्रँड्सपैकी एक आहे.

Mi TV 5X सिरीजमध्ये काय आहे खास

तीनही मॉडेल्समध्ये 4K पॅनल 3840 x 2160 पिक्सेल रिझोल्यूशन आणि HDR 10Plus आणि डॉली व्हिजन्स सपोर्ट आहे. Mi TV 5X च्या तीनही मॉडेल्सचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो वेगवेगळा आहे, 43 आणि 50 इंच दोन्ही टीव्ही जवळपास 96 टक्के आणि 55-इंच व्हेरिएंटचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 96.6 टक्के इतका आहे.

Mi TV 5X 64 बिट क्वाड कोर A55 CPU द्वारे सपोर्टेड आहे, जो Mali G52 MP2 सह जोडला गेला आहे. हा 2 टीव्ही जीबी रॅम आणि 16 जीबी इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. यात तुम्हाला हँड्सफ्री गुगल असिस्टंटचाही अॅक्सेस मिळतो. पोर्ट ऑप्शन्समध्ये 3x HDMI 2.1, 2x USB, इथरनेट, 1x ऑप्टिकल, 1×3.5mm, AV इनपुट आणि H.265 समाविष्ट आहे.

लेटेस्ट सिरीज ड्युअल स्पीकर सेटअपसह येते, जी डॉल्बी अॅटमॉस आणि डीटीएस-एचडीला सपोर्ट करते. 43 इंच व्हेरिएंटमध्ये 30W स्टीरिओ स्पीकर्स आहेत, तर 50 इंच आणि 55 इंच व्हेरिएंटमध्ये 40W स्टीरिओ स्पीकर्स आहेत.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Xiaomi launched 3 great Smart TVs of Mi TV 5X series in India, know more details)