AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Vivo Y33s हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 7:04 PM
Share

मुंबई : Vivo Y33s हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला आहे. हा फोन मिड रेंज सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत 17,990 रुपये इतकी आहे. Vivo चा नवीन स्मार्टफोन 8.0mm जाडीसह येतो. दुसरीकडे, त्याची आणखी एक खासियत म्हणजे या फोनचा ट्रिपल लेन्स कॅमेरा सेटअप, ज्यामध्ये आपल्याला 50 मेगापिक्सल सुपर नाईट सेन्सर मिळतो. त्याच वेळी, हा फोन आपल्याला पूर्णपणे कमी प्रकाशातही चांगले फोटो क्लिक करु शकतो. (Vivo Y33s launched with 50MP triple camera, 5000mAh battery, check price and features)

Vivo Y33s ला Vivo Y21 च्या प्राईस रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहे. हा फोन गेल्या आठवड्यात 15,490 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. Y33s स्टेप अप ऑप्शन, उत्तम डिस्प्ले, कॅमेरा आणि प्रोसेसरसह येतो. हा फोन आपण दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकता ज्यात मिरर ब्लॅक, मिड डे ड्रीम समाविष्ट आहे. हे डिव्हाईस 23 ऑगस्ट 2021 पासून विवो इंडिया ई-स्टोअर, Amazon, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटाक्लिक, बजाज फिनसर्व ईएमआय स्टोअर आणि सर्व किरकोळ स्टोअरमध्ये उपलब्ध होईल.

विवोने Y33 साठी लॉन्च ऑफर देखील दिल्या आहेत. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर ग्राहक 30 सप्टेंबरपर्यंत 1500 रुपयांचा कॅशबॅक मिळवू शकतात. Vivo येथे 7000 रुपयांचा लाभ देखील देत आहे, जो जिओ वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. ऑनलाईन ग्राहक 1500 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 9 महिन्यांसाठी नो कॉस्ट ईएमआय पर्याय निवडू शकतात.

फीचर्स

फोनमध्ये 6.58 इंचांची FHD + LCD स्क्रीन आहे. यात ऑक्टा कोर मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसर आहे, जो फनटच ओएस 11.1 वर आधारित अँड्रॉइड 11 वर काम करतो. स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसह येतो. स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा सेन्सर, 2 मेगापिक्सेल बोकेह आणि 2 मेगापिक्सेल सुपर मॅक्रो लेन्ससह फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांच्या बाबतीत, यात 2.4GHz वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप सी, जीपीएस, ओटीजी आहे.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Vivo Y33s launched with 50MP triple camera, 5000mAh battery, check price and features)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.