आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस (OnePlus) एक नवीन स्मार्टफोन वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:11 AM

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता वनप्लस (OnePlus) एक नवीन स्मार्टफोन वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) लॉन्च करण्याची योजना आखत आहे. एका नवीन अहवालात दावा करण्यात आला आहे की, वनप्लस कंपनी त्याच्या ‘टी’ सीरीजमधील एका नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे. वनप्लस 8 सीरीजसह, कंपनीने एक वेगळा प्रयोग करत वनप्लस 8 टी मॉडेल लाँच केले आणि आता वनप्लस 9 सह असेच काहीतरी करण्याची योजना कंपनी आखत आहे. परंतु या स्मार्टफोनसह कंपनी वनप्लस 9 आरचा (OnePlus 9R) फाउंडेशन म्हणून वापर करेल. वनप्लस 9 आरटी मॉडेलबद्दल काही माहिती आधीच उघड झाली आहे. (OnePlus 9RT price and full specifications leaked, know more)

OnePlus 9RT च्या लीक फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, हा स्मार्टफोन मागील वर्षी लॉन्च केलेल्या OnePlus 9R सारखाच असेल. नवीन लीक्समध्ये, टिपस्टर मुकुल शर्मा यांनी Weibo चा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात OnePlus 9RT चे फीचर्स उघड केले आहेत. OnePlus 9RT ची किंमत 34,000 रुपये असू शकते. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळेल. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 41,000 रुपये इतकी असेल. याशिवाय जर तुम्ही 12 जीबी रॅम आणि 256 जीबी व्हेरिएंट घेत असाल तर तुम्हाला 44,000 रुपये मोजावे लागू शकतात.

वनप्लस 9 आरटी केवळ लिमिटेड मार्केटसाठी असेल ज्यात भारत आणि चीनचा समावेश आहे. वनप्लस 9 आरच्या तुलनेत ज्याची सुरुवातीची किंमत 39,999 रुपये आहे, ज्यामध्ये आपल्याला 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळते. त्याचबरोबर 256 जीबी स्टोरेज स्पेस असलेल्या मॉडेलची किंमत 43,999 रुपये आहे.

या स्मार्टफोनबाबतच्या अहवालात असा दावा केला जात आहे की, या वर्षी वनप्लस 9 टी लाँच होणार नाही. वनप्लस ‘टी’ मालिका कंपनीच्या फ्लॅगशिप मालिकेची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल. आता अँड्रॉइड सेंट्रलच्या एका अहवालात, इनसाइडर सोर्सचा हवाला देत, असे म्हटले गेले आहे की, टी सीरीजचा पुढील फोन या वर्षी लाँच केला जाईल, जो वनप्लस 9 आरटी (OnePlus 9RT) आहे, जो भारतीय आणि चीनी बाजारात लॉन्च केला जाईल.

फीचर्स

या फोनच्या नावानुसार, ही वनप्लस 9 आर ची एक ट्वीक्ड आवृत्ती असेल जी वनप्लस 9 सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन असेल. स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर OnePlus 9RT ला OnePlus 9R सारखे 120Hz AMOLED पॅनल मिळेल. यात 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल आणि यासोबत 4500mAh ची बॅटरी मिळेल. या व्यतिरिक्त, त्याला स्नॅपड्रॅगन 870 ची हायर-बिन्ड आवृत्ती मिळेल. दुसरीकडे, जर आपण कॅमेराबद्दल बोललो तर या फोनला वनप्लस नॉर्ड 2 प्रमाणे 50 मेगापिक्सलचा सोनी IMX766 सेन्सर मिळेल.

सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाल्यास, हा पहिला वनप्लस फोन असेल जो Android 12 ऑउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड OxygenOS 12 वर चालेल. हे ColorOS अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्ये आणेल. OxygenOS 12 मध्ये गुगलचा नवीन मटेरियल यू एस्थेटिंक मिळेल. यासह, अहवालात असेही म्हटले गेले आहे की, कंपनी ऑक्सिजन ओएस 12 ची बीटा आवृत्ती लॉन्च करण्याची योजना आखत होती, परंतु अनेक बग्समुळे त्याचे लाँचिंग थांबवण्यात आले. कंपनीची सॉफ्टवेअर टीम या बगचे निराकरण करण्याचे काम करत आहे. तथापि, वनप्लस 9 आरटी किंवा ऑक्सिजन ओएस 12 च्या क्लोज्ड बीटा वर्जनबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.

इतर बातम्या

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा, 8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन लाँच

24/7 ब्लड प्रेशर मॉनिटरिंग, SpO2 सेन्सरसह Xiaomi Mi Band 6 लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स़

(OnePlus 9RT price and full specifications leaked, know more)

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.