5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा, 8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन लाँच

Realme ने सोमवारी भारतात C21Y स्मार्टफोन लाँच केला. रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे.

5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा, 8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन लाँच
Follow us
| Updated on: Aug 23, 2021 | 6:36 PM

मुंबई : Realme ने सोमवारी भारतात C21Y स्मार्टफोन लाँच केला. रियलमी C21Y हा लेटेस्ट एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये तुम्हाला मोठी बॅटरी आणि मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सी सीरीजच्या फोनसारखाच आहे. C21Y लाइट वापरकर्त्यांसाठी एक उत्तम फोन आहे. त्याच वेळी, जे लोक फीचर फोनवरून स्मार्टफोनवर स्विच करत आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा फोन एक उत्तम पर्याय आहे. (Realme C21Y launched with 5000mAh battery and 13 megapixel triple camera in 8K range)

गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये Realme C21Y लाँच करण्यात आला होता. एंट्री लेव्हल स्मार्टफोन असूनही, यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, यात आय प्रोटेक्शन फीचरचाही समावेश आहे. Realme C21Y TUV Rheinland प्रमाणित डिस्प्ले वापरते, जो हाय ब्राईटनेस, व्हाइट लाइट आणि आय प्रोटेक्शन फीचरसह येतो.

रियलमी C21Y ची किंमत 8,999 रुपये इतकी आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज स्पेस मिळेल. त्याचबरोबर 9,999 रुपयांमध्ये तुम्हाला 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळते. हा फोन क्रॉस ब्लू आणि क्रॉल ब्लॅक रंगात येतो. फोनचा पहिला सेल 30 ऑगस्टला फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता सुरू होईल.

फोनचे फीचर्स

Realme C21Y हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो ड्युअल सिम कार्ड आणि 4G VoLTE सह येतो. यात अँड्रॉइड 10 आधारित Realme यूआय सॉफ्टवेअर देखील आहे. Realme आधीच अधिकाधिक स्मार्टफोनमध्ये Android 11 देत आहे. फोनमध्ये Octa core Unisoc T610 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोनमध्ये 4 जीबी LPDDR4x रॅम आहे, जो 64 जीबी स्टोरेजसह येतो. त्याचबरोबर स्टोरेज वाढवण्यासाठी त्यात मायक्रो एसडी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे.

रियलमी C21Y मध्ये 6.5-इंचांचा HD + डिस्प्ले आहे जो Teardrop Notch सह येतो. फोनमध्ये 88.7 टक्के पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा आहे. नॉचमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला फिजिकल फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Realme C21Y launched with 5000mAh battery and 13 megapixel triple camera in 8K range)

Non Stop LIVE Update
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य
'राऊतांच्या अंगात आल्यानं सरकार बनलं अन्...', काँग्रेस नेत्याच वक्तव्य.
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट
2019 मध्ये काय झालं? अन् पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांचा गौप्यस्फोट.
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले...
मनसेच्या सभेसाठी निमंत्रण अन् रिकामी खूर्ची... राऊत भडकले; म्हणाले....
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा
विधानसभेत शरद पवारांच्या किती जागा निवडून येणार? केला मोठा दावा.
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'
दानवेंच्या व्हिडीओवरुन घमासान, तो कार्यकर्ता म्हणाला, 'आमची मैत्री...'.
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल
भाजप-काँग्रेसला विचारधारा पण राष्ट्रवादीचं काय? छगन भुजबळांचा सवाल.
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले...
अमित ठाकरेंना पाठिंबा नाहीच, शिवरायांची शपथ घेत उद्धव ठाकरे म्हणाले....
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण
राज यांच्या सभेत राऊतांसाठी एक खूर्ची, 'मनसे'च्या सभेसाठी निमंत्रण.
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात
'मोदी अन् शाहांच्या बॅगा जाताना तपासा, कारण...' ठाकरेंचा घणाघात.
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज
'...तर उद्धव ठाकरेंनी बाय रोड जाऊन दाखवावं', नारायण राणेंचं ओपन चॅलेंज.