108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

मोटोरोलाने गेल्या आठवड्यात मोटो एज 20 (Moto Edge 20) आणि मोटो एज 20 फ्यूजन (Moto Edge 20 Fusion) भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत.

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 8:00 AM

मुंबई : मोटोरोलाने गेल्या आठवड्यात मोटो एज 20 (Moto Edge 20) आणि मोटो एज 20 फ्यूजन (Moto Edge 20 Fusion) भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपीय बाजारात Edge 20 सिरीज अधिकृतपण लाँच केली होती, ज्यात मोटो एज 20, मोटो एज 20 लाइट, मोटो एज 20 प्रो यांचा समावेश आहे. तथापि, मोटोरोलाने भारतात फक्त दोन मॉडेल्स लाँच केले आहेत आणि मोटो एज 20 प्रो वगळला आहे, जे लाइन मॉडेलमध्ये सर्वात टॉप व्हेरिएंट होतं. मोटो एज 20 फ्यूजन ही मोटो एज 20 लाइटची रीब्रांडेड आवृत्ती आहे, कारण दोन्ही स्मार्टफोनचे स्पेक्स कमी – अधिक प्रमाणात सारखेच आहेत. (Moto Edge 20 first sale on flipkart From today, Moto Edge 20 Fusion sale on 27 august)

मोटो एज 20 ची बाजारात वनप्लस नॉर्ड 2, विवो व्ही 21 आणि ओप्पो रेनो 6 या स्मार्टफोनशी टक्कर होईल. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन Nord CE, Samsung M42, Mi 10i आणि अगदी Redmi Note 10 Pro Max शी स्पर्धा करेल. मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन मिड-बजेट रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्हीमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन

मोटो एज 20 चे 8GB वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन 6 जीबी व्हेरिएंट 21,499 रुपये आणि 8 जीबी रॅम +128 जीबी व्हेरिएंट 22,999 रुपये या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. मोटो एज 20 दोन रंगांमध्ये येतो ज्यात फ्रॉस्टेड पर्ल आणि फ्रॉस्टेड एमराल्डचा समावेश आहे. तर मोटो एज 20 फ्यूजन इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील या दोन रंगांमध्ये येतो. मोटो एज 20 चा पहिला सेल आजपासून (24 ऑगस्ट) सुरु होत आहे. तर मोटो एज 20 फ्यूजन 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.

फीचर्स

मोटो एज 20 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. मोटो एज हा भारतातील सर्वात पातळ आणि सर्वात हलका 5G फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G, 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. आपण ही स्पेस एक्सपांडदेखील करू शकता.

कॅमेरा आणि बॅटरी

कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, मोटो एज 20 मध्ये टेलिफोटो लेन्स आणि 30x डिजिटल झूमसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देखील आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो एज 20 मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे, जी 30 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 10 मिनिटांत 8 तासांची पॉवर देऊ शकतो.

डिस्काऊंट ऑफर

मोटो एज 20 हा फोन फ्लिपकार्टवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी Axis Bank Credit Card द्वारे पेमेंट केलं तर त्यांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. Bank of Baroda च्या Mastercard debit card ने पहिलं पेमेंट केल्यास ग्राहकांना 10% डिस्काऊंट मिळू शकतो. ICICI Bank, IndusInd Bank च्या Amex Network Card द्वारे पहिलं ट्रान्झॅक्शन करणाऱ्या ग्राहकांना 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळू शकतो.

इतर बातम्या

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

5000mAh बॅटरीसह ट्रिपल कॅमेरा, 8000 रुपयांच्या रेंजमध्ये Realme चा ढासू स्मार्टफोन लाँच

Airtel चे 3 शानदार प्लॅन्स, भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन मिळणार

(Moto Edge 20 first sale on flipkart From today, Moto Edge 20 Fusion sale on 27 august)

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.