AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airtel चे 3 शानदार प्लॅन्स, भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन मिळणार

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएसची सुविधा मिळेल.

Airtel चे 3 शानदार प्लॅन्स, भरपूर डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि फ्री ओटीटी सब्सक्रिप्शन मिळणार
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 8:19 AM
Share

मुंबई : तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल आणि तुमच्यासाठी एक उत्तम प्लॅन शोधत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्हाला अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएसची सुविधा मिळेल. या प्लॅन्सची वैधता एका वर्षासाठी आहे, म्हणजे आपण वर्षभर कोणत्याही टेंशनशिवाय सर्व सुविधांचा लाभ घेऊ शकता. (Airtel best 1 year plans, 2498 rs, 2698 rs and 1498 plan will give many benefits)

या प्लॅन्सची ​​किंमत 2000 रुपयांपेक्षा जास्त आहे आणि अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएस प्लस अमेझॉन प्राइम सबस्क्रिप्शन, Apollo 24|7 Circle चं सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यून, विंक म्युझिक फ्री, शॉ अकादमीचा मोफत ऑनलाइन कोर्स आणि 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅक मिळतो. चला तर मग जाणून घेऊया प्लॅन्सविषयी सर्वकाही…

Airtel चा 2498 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची वैधता 365 दिवस आहे आणि यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतील. या प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon प्राइमचं 30 दिवसांचं फ्री ट्रायल, अपोलो 24 | 7 सर्कलचे 3 महिन्यांचे सबस्क्रिप्शन, एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिकचे मोफत सबस्क्रिप्शन, एक वर्षासाठी शॉ अकादमीचे मोफत ऑनलाईन कोर्सेस, अनलिमिटेड मोफत हॅलोट्यून्स आणि बरेच काही मिळणार आहे. 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे.

Airtel चा 2698 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची ​​वैधता एका वर्षासाठी आहे आणि यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, ट्रूली अनलिमिटेड कॉल आणि दररोज 100 SMS मिळतात. यासह, या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीचे एक वर्षासाठी मोफत सबस्क्रिप्शन, 30 दिवसांसाठी Amazon प्राइम, अपोलो 24 | 7 सर्कल सब्सक्रिप्शन 3 महिन्यांसाठी, एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिकची विनामूल्य सदस्यता मिळेल. तसेच एक वर्षासाठी शॉ अकादमीचे मोफत ऑनलाईन कोर्सेस, अनलिमिटेड फ्री हॅलोट्यून्स आणि बरेच काही मिळणार आहे. 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे.

Airtel चा 1498 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला एका वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग, 24GB डेटा आणि 3600 SMS ची सुविधा मिळेल. यासह, तुम्हाला Amazon प्राइमचं 30 दिवसांसाठी फ्री ट्रायल, अपोलो 24 | 7 सर्कल सब्सक्रिप्शन, एअरटेल एक्सस्ट्रीम प्रीमियम आणि विंक म्युझिकची विनामूल्य सदस्यता मिळेल. तसेच एक वर्षासाठी शॉ अकादमीचे मोफत ऑनलाईन कोर्सेस, अनलिमिटेड फ्री हॅलोट्यून्स आणि बरेच काही मिळणार आहे. 100 रुपयांचा फास्टॅग कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे.

इतर बातम्या

आता iOS वापरकर्तेही खेळू शकतात बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया, डाऊनलोडसाठी गेम उपलब्ध

भारतात 5G ची मारामार, तिकडे LG कडून 6G टेस्टिंग, डेटा ट्रान्समिशन प्रक्रिया यशस्वीपणे पार

रिअलमीने लाँच केले रिअलमी जीटी स्मार्टफोन आणि स्लिम बुक लॅपटॉप, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Airtel best 1 year plans, 2498 rs, 2698 rs and 1498 plan will give many benefits)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.