50MP क्वाड कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi 10 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स

| Updated on: Aug 16, 2021 | 7:10 AM

रेडमी (Redmi) कंपनीने रेडमी नोट 10 सिरीजमधील (Redmi Note 10 Series) स्मार्टफोन भारतात किफायतशीर किंमत आणि दमदार फीचर्ससह लाँच केले होते. लवकरच रेडमी 10 सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन बाजारात लाँच होणार आहे.

50MP क्वाड कॅमेरा, 5000mAh बॅटरीसह Redmi 10 स्मार्टफोन लाँचिंगसाठी सज्ज, जाणून घ्या फीचर्स
Redmi-10
Follow us on

मुंबई : रेडमी (Redmi) कंपनीने रेडमी नोट 10 सिरीजमधील (Redmi Note 10 Series) स्मार्टफोन भारतात किफायतशीर किंमत आणि दमदार फीचर्ससह लाँच केले होते. लवकरच रेडमी 10 सिरीजमधील आणखी एक स्मार्टफोन बाजारात लाँच होणार आहे. मात्र लाँचिगपूर्वी या स्मार्टफोनचे फिचर्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोनची बॅटरी 5000 mAh क्षमतेची असून त्यासोबत मीडियाटेक हेलियो जी 88 एसओसी चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. (Xiaomi Redmi 10 images specification features revealed know more Details here)

रेडमी 10 या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच एलसीडी पॅनल देण्यात आले आहे. याचे रिझॉल्यूशन 2400 x 1080 पिक्सल इतके आहे. या फोनमध्ये अॅडॉप्टिवसिंक रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात येणार असून या फोनला 90Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनमध्ये punch hole डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 3 देण्यात आला आहे. या फोनची बॉडी पॉलिकॉर्बोनेटने बनवण्यात आली आहे.

या फोनमध्ये चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यात 50 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल मायक्रो आणि डेप्थ सेन्सर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये ड्युल सिम, 4 जी, ड्यूल बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, युएसबी टाईप सी यासह अन्य काही फिचर्स देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन 4GB + 64GB, 4GB + 128GB आणि 6GB+ 128GB अशा तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच हा फोन ग्रे, व्हाईट आणि ब्लू या तीन रंगात उपलब्ध होणार आहे. या फोनमधील इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाल्यास यामध्ये अँड्रॉइड 11 वर आधारित MIUI 12, 18W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आणि 3.5mm ऑडिओ जॅक मिळेल. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, फोन ड्युअल-सिम, 4 जी, ड्युअल-बँड वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी टाइप-सीला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

Hiring Trends 2021 : डार्व्हिन बॉक्सचे सहसंस्थापक म्हणतात, सध्या सर्वांचं लक्ष केवळ प्रोफेशनल जॉब्सकडे

डेल्टा व्हेरिएंटची भीती, गुगल, अमेझॉननंतर Facebook कडून कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावण्याचा निर्णय स्थगित

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

(Xiaomi Redmi 10 images specification features revealed know more Details here)