AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

फेसबुकने (Facebook) अनेक रशियन अकाऊंट्स बॅन केले आहेत, ज्यावरुन रशियन डिसइन्फेक्ट नेटवर्कसह लिंक्स शेअर केल्या जात होत्या.

कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
facebook
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 12, 2021 | 7:28 PM
Share

मुंबई : फेसबुकने (Facebook) अनेक रशियन अकाऊंट्स बॅन केले आहेत, ज्यावरुन रशियन डिसइन्फेक्ट नेटवर्कसह लिंक्स शेअर केल्या जात होत्या. या लिंक्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, फायझर आणि एस्ट्राझेनेका कंपन्यांनी तयार केलेली कोव्हिड -19 लस लोकांना चिंपांझी बनवू शकते. हे नेटवर्क रशियामध्ये सुरू झाले आणि त्यावरुन प्रामुख्याने भारत, लॅटिन अमेरिका आणि अमेरिकेतील युजर्सना लक्ष्य केले गेले. (Facebook Bans Russian Network For Claiming Covid Vaccine Will Turn Humans Into Chimps)

सोशल मीडिया दिग्गज कंपनीने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात म्हटले आहे की, फेसबुकच्या तपासात उघड झाले आहे की, काही अकाऊंट्सवरुन कोव्हिड लसीविरोधात मोहिम राबवली जात आहे. फॅज यूके-नोंदणीकृत विपणन फर्मची उपकंपनी आहे, जी प्रामुख्याने रशियामधून कार्यरत होती. बेन निम्मो, ग्लोबल आयओ थ्रेट इंटेलिजन्स लीड आणि फेसबुक आयओ थ्रेट इंटेलिजन्स टीमने त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, “आम्ही परदेशी हस्तक्षेपाविरूद्ध आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल 65 फेसबुक खाती आणि 243 इंस्टाग्राम खाती डिलीट केली आहेत.

बेन निम्मोने म्हटले आहे की, हे नेटवर्क एक डझनहून अधिक प्लॅटफॉर्मवर काम करते, परंतु युजर्स निर्माण करण्यात अपयशी ठरले. आमच्या तपासात असे आढळून आले आहे की, या मोहिमेचा आणि फॅजचा संबंध होता. फॅजला आता आमच्या व्यासपीठावर बंदी घालण्यात आली आहे. लॅटिन अमेरिका, भारत आणि अमेरिका यासह अनेक सरकारे या संबंधित लसींसाठी आणीबाणी प्राधिकरणावर चर्चा करत आहेत.

अनेक प्लॅटफॉर्म्सवर दिशाभूल करणारे लेख आणि याचिका तयार करण्यात आल्याचे फेसबुकच्या तपासात उघड झाले आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामसह सोशल मीडियावरील बनावट खात्यांचा वापर ऑफ-प्लॅटफॉर्म कंटेंट सीड वाढवणे, क्रूड स्पॅमी स्ट्रॅटेजीचा उपयोग करता यावा, यासाठी केला जात होता. फेसबुकने म्हटले आहे की, 14 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान, ऑपरेशनच्या हॅशटॅगसह सुमारे 10,000 पोस्ट करण्यात आल्या होत्या, ज्यात अनेकदा ऑपरेशनच्या ऑफ-प्लॅटफॉर्म आर्टिकल्सच्या लिंक होत्या.

इतर बातम्या

 108MP कॅमेरा आणि 120W चार्जिंग सपोर्टसह Mi Mix 4 स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!

Vodafone-Idea चे दोन ढासू प्लॅन लाँच, कुटुंबातील 5 सदस्यांच्या मोबाईलवर सर्वकाही FREE

(Facebook Bans Russian Network For Claiming Covid Vaccine Will Turn Humans Into Chimps)

Follow Us
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप