AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vodafone-Idea चे दोन ढासू प्लॅन लाँच, कुटुंबातील 5 सदस्यांच्या मोबाईलवर सर्वकाही FREE

व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी Redx Family नावाचे दोन नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना सुरू केल्या आहेत.

Vodafone-Idea चे दोन ढासू प्लॅन लाँच, कुटुंबातील 5 सदस्यांच्या मोबाईलवर सर्वकाही FREE
Vodafone Idea
| Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 11, 2021 | 7:13 AM
Share

मुंबई : व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी Redx Family नावाचे दोन नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. कंपनीने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योजना सुरू केल्या आहेत, ज्याची किंमत 1,699 रुपये आणि 2,299 रुपये इतकी आहे. या योजना अनुक्रमे 3 आणि 5 सदस्यांद्वारे वापरल्या जाऊ शकतात. प्रायमरी युजर्स या प्लॅन्समध्ये अनुक्रमे दोन किंवा चार सदस्य जोडू शकतात. (Vodafone Idea RedX Family plan launched with price of Rs 1699 and 2299, 5 members will get everything for free)

1,699 च्या व्होडाफोन-आयडिया रेडएक्स फॅमिली प्लॅनबद्दल (Vodafone-Idea RedX Family) बोलायचे झाल्यास, हा प्लॅन घेणारा ग्राहक त्यात आणखी दोन लोकांना जोडू शकतो, याचा अर्थ या प्लॅनमध्ये एकूण 3 सदस्य सपोर्ट करतात. या प्लॅननुसार, प्रायमरी आणि सेकेंडरी दोन्ही सदस्यांना अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि राष्ट्रीय रोमिंग कॉल्सची सुविधा मिळेल. यासह, सर्व सदस्यांना दर महिन्याला अनलिमिटेड डेटा आणि 3000 एसएमएस मिळतील.

व्होडाफोन आयडियाच्या या प्लॅनमध्ये, प्रायमरी सदस्यांसाठी एक वर्षासाठी Amazon प्राइम मेंबरशिप, एक वर्षासाठी नेटफ्लिक्स आणि एक वर्षासाठी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीची फ्री मेंबरशिप मिळणार आहे. यासह, त्याला आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ लाउंजचा अॅक्सेस मिळेल. तसेच यूएसए आणि कॅनडासाठी ISD कॉल 50 पैसे प्रति मिनिट आणि यूकेसाठी 3 रुपये प्रति मिनिट आकारले जातील.

2,299 रुपयांचा Vodafone-Idea RedX Family प्लॅन

या प्लॅनमध्ये 5 युजर्स सपोर्टेड आहेत. याचा अर्थ असा की प्रायमरी सदस्यासह 4 सेकेंडरी युजर्स यात जोडू शकतो. या व्यतिरिक्त यात कोणतेही बदल केले गेले नाहीत. यामध्ये सर्व सदस्यांना अनलिमिटेड कॉलिंग, डेटा बेनिफिट्स आणि एसएमएस सुविधा मिळतील. यासह, या प्लॅनमध्ये तुम्हाला OTT अॅप्सचं सब्सक्रिप्शन आणि ISD कॉलिंग रेट्सची समान सुविधा असेल.

Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स

  • Vi चा 109 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 20 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 1GB डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला आउटगोइंग एसएमएसची सुविधा मिळणार नाही.
  • Vi चा 129 रुपयांचा प्लॅन : या प्लानची वैधता 24 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळेल.
  • Vi चा 148 रुपयांचा प्लॅन :  या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 1GB डेटा आणि 100 SMS मिळतील. या प्लॅनची वैधतादेखील 18 दिवसांची आहे.
  • Vi चा 149 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, 2GB डेटा आणि 300 SMS ची सुविधा मिळते. यासह, Vi movies and TV चं विनामूल्य सब्सक्रिप्शन मिळतं.

इतर बातम्या

5G नेटवर्कची सर्वत्र चर्चा, पण इंटरनेट स्पीड किती असणार?

अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा पाहिजे? Vi चे 150 रुपयांहून कमी किंमतीचे प्लॅन्स पाहा

(Vodafone Idea RedX Family plan launched with price of Rs 1699 and 2299, 5 members will get everything for free)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?