5G नेटवर्कची सर्वत्र चर्चा, पण इंटरनेट स्पीड किती असणार?

हल्ली अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण स्मार्टफोन, इंटरनेट, वायफाय, नेटवर्क यांसारखे शब्द सहज उच्चारताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण 5G नेटवर्कबद्दल चर्चा करत आहेत

5G नेटवर्कची सर्वत्र चर्चा, पण इंटरनेट स्पीड किती असणार?
5G
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अनिश बेंद्रे

Aug 10, 2021 | 8:20 AM

मुंबई : हल्ली अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वचजण स्मार्टफोन, इंटरनेट, वायफाय, नेटवर्क यांसारखे शब्द सहज उच्चारताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण 5G नेटवर्कबद्दल चर्चा करत आहेत. हे नेटवर्क फार सुपरफास्ट असेल असेही बोलले जात आहे. मात्र हे 5G नेटवर्क नक्की प्रभावी असणार का? ते कधी सुरु होणार? त्याचा स्पीड कसा असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (5G Network data speed india, know all the details)

तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या हातात मोबाईल यायला लागले. तो काळ 2G चा होता. मोबाईलमध्ये इंटरनेट होतं, परंतु खूप धिम्या गतीने ते चालायचं. त्यानंतर बाजारात 3G आलं, आणि लोकांना वेगवान इंटरनेट मिळू लागलं. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया यांसारख्या अनेक कंपन्यांनी 3 जी सेवा देऊ केल्या आणि त्यानंतर 4G तंत्रज्ञान आले. त्यानंतर आता 5G नेटवर्कची चर्चा सुरु आहे.

तुम्हाला 2G, 3G, 4G नेटवर्क बद्दल माहितच असेल. आता मोबाईल डेटाचा वापर फक्त ब्राऊजरचा वापर करण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून आणखी खूप काम सहज होतात. 3G ने वेब ब्राऊजिंग आणि डेटावर चालणाऱ्या सेवांना अधिक उपयोगी बनवले आहे. 4G नेटवर्कमुळे तर जग जवळ आले आहे. बँडविड्थ वाढल्याने 4G मुळे किती तरी कामं सोपी झाले आहेत. 4G नेटवर्कमुळे ऑनलाईन व्हिडीओ कॉलिंगपासून ते व्हिडीओ बघण्यापर्यंत सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे.

नेटवर्कच स्पीड किती?

5G नेटवर्क म्हणजे पाचवी जनरेशन. या नेटवर्कमुळे आपले काम आणखी सोपे होणार आहे. 5G नेटवर्क कमीत कमी 20 gbps डाऊनलिंक आणि 10 gbps अपलिंकने चालेल, असे बोललं जात आहे. त्यामुळे आताच्या 4G नेटवर्कपेक्षा 40 पटीने जास्त स्पीड मिळेल.

अनेक कंपन्यांकडून गुंतवणूक

5G या जास्त स्पीडवाल्या नेटवर्कमुळे आपण अत्याधुनिक टेक्नोलॉजी वापरु शकतो. यात तुम्ही वर्च्युअल रिअॅलिटीपासून क्लाऊडवर गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतो. 5G चा उपयोग बिझनेस आणि ऑर्गनायझेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. यामुळे कामांमध्ये ऑटोमेशन येईल. सध्या Samsung, Nokia, Apple, Intel, Huawei यासारख्या अनेक कंपन्या 5G नेटवर्कमध्ये गुंतवणूक करत आहेत.

काय आहे 5G?

5 जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation). वेगवान इंटरनेट स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही. भारत सरकारने 5G चाचणीला परवानगी दिली, टेलिकॉम कंपन्यांना स्पेक्ट्रम उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. भारती एअरटेलनेही 5 जी नेटवर्कची चाचणी सुरु केली आहे.

वास्तविक, 5 जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी आहे. याला 4 जी नेटवर्कची पुढील आवृत्ती म्हटले जाऊ शकते. यात वापरकर्त्यांना अधिक इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु 5 जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.

इतर बातम्या

5G Testing | मुंबई, दिल्ली, कोलकात्यासह देशातील ग्रामीण भागातही 5G ट्रायल्स

5G संदर्भात सरकारचं आणखी एक पाऊल, Jio, Airtel सह ‘या’ बड्या कंपन्यांना स्पेक्ट्रम मंजूर

PHOTOS : 5G आल्यानं तुमचं आयुष्य बदलून जाणार, केवळ फोनच नाही तर यावरही परिणाम होणार

(5G Network data speed india, know all the details)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें