
आपल्या जीवनात स्मार्टफोन इतके आवश्यक उपकरण बनले आहे की त्यांच्याशिवाय एक दिवसही जगणे कठीण वाटते. आज स्मार्टफोनमुळे आपली जवळजवळ सर्व कामे अशक्य आहेत. त्याच बरोबर संपूर्ण दिवस स्मार्टफोन वापरल्याने जलदगतीने फोनची चार्जिंग संपते. त्यामुळे आपण जलद चार्जिंगचे चार्ज वापरतो. पण अनेकदा असे दिसून येते की स्मार्टफोन जलद चार्जिंगला सपोर्ट करत असते, परंतु फोन हळूहळू चार्ज होतात. बहुतेकवेळा फोनचा वापर जास्त झाल्याने गरम होतो किंवा बॅकग्राउंडमध्ये चालू असलेल्या अॅप्समुळे फोन स्लो चार्ज होते. आजच्या लेखात आपण स्मार्टफोन जलद चार्ज करण्यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.
ओरिजनल चार्जर आणि केबल
तुमचा फोन जलद चार्ज करण्यासाठी नेहमी ओरिजनल चार्जर आणि केबल वापरा. तसेच तुमच्या फोनचा चार्जिंग करंट तपासा. त्यानुसार चार्जर आणि केबल निवडा. तुमच्या स्मार्टफोनच्या ब्रँडचा सुसंगत चार्जर वापरण्याचा प्रयत्न करा. स्वस्त किंवा थर्ड-पार्टी चार्जर वापरल्याने तुमच्या फोनची चार्जिंग मंदावू शकते.
चार्जिंग करताना फोन आयडल मोडमध्ये ठेवा
तुम्हाला जर तुमचा फोन जलद चार्ज करायचा असेल तर एअरप्लेन मोड चालू करा. स्मार्टफोन चालू असताना, सिग्नल, वाय-फाय, ब्लूटूथ आणि जीपीएस चालू असल्यास बॅटरी जलद संपू लागते. यामुळे सिस्टम बॅकग्राउंडमध्ये चालू राहते, बॅटरी संपते, ज्यामुळे चार्जिंग स्लो होते. तुम्ही फोन चार्ज करत असताना वापरणे टाळावे. यामुळे चार्जिंग देखील मंदावते. तसेच बॅकग्राउंडमध्ये चालू असलेले कोणतेही अॅप्स बंद करा.
तुमचा फोन थंड ठेवा
तुमच्या फोनला गरम होण्याची समस्या असेल, तर ते बॅटरीसाठी चांगले नाही. फोन गरम झाल्यावर चार्जिंगचा वेग हळूहळू कमी होतो. चार्जिंग करताना जास्त गरम होण्याचे टाळा. जर चार्जिंग दरम्यान फोन गरम होत असेल, तर फोनचे कव्हर काढून टाका. तसेच, तो ब्लँकेट किंवा बेडखाली न ठेऊ नका. वायरलेस चार्जिंग दरम्यान फोन देखील गरम होतो. म्हणून, वायरलेस चार्जरचा वापर जपून करा.
या गोष्टी लक्षात ठेवा
तुमच्या स्मार्टफोनचा चार्जिंग पोर्ट स्वच्छ ठेवा. धूळ अनेकदा आत अडकू शकते, ज्यामुळे केबल व्यवस्थित लॉक होत नाही आणि चार्जिंग स्लो होते. याव्यतिरिक्त ब्रँड वेळोवेळी त्यांच्या फोनसाठी अपडेट्स जारी करतात. या अपडेट्समध्ये बॅटरी व्यवस्थापन आणि चार्जिंग गती सुधारण्यासाठी अनेकदा सुधारणा समाविष्ट असतात. म्हणून तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेटेड ठेवा.