Zomato CEO च्या चेहऱ्यावर का लावलंय ‘Temple’? 225 कोटी खर्चून…

Eternal चे CEO आणि Zomato चे संस्थापक दीपिंदर गोयल गेल्या वर्षभरापासून हा छोटासा डिव्हाईस वापरतानात दिसत आहे. पण हा डिव्हाईस नेमकं करतो तरी काय आणि कशासाठी वापरला जातो ? गोयल यांनी त्यासाठी 225 कोटी खर्च तरी का केले ?

Zomato CEO च्या चेहऱ्यावर का लावलंय ‘Temple’? 225 कोटी खर्चून...
झोमॅटोच्या सीईओच्या चेहऱ्यावरील डिव्हाइसची चर्चा
| Updated on: Jan 06, 2026 | 11:20 AM

Eternal चे CEO आणि Zomato चे संस्थापक दीपिंदर गोयल हे पुन्हाएकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. नुकतेच ते राज शमानी याच्या पॉडकास्टमध्ये दिसले, मात्र तिथे ते काय बोलले यापेक्षा त्यांच्या लूकने सर्वांचे लक्ष जास्त वेधून घेतलं. या पॉडकास्टमध्ये आलेल्या गोयल यांन त्यांच्या चेहऱ्यावर, कानशिलाजवळ एक विचित्रल डिव्हाईस लावला होता, त्याचीच नेटकऱ्यांमध्ये सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. हे डिव्हाईस दिसायलं जितकं अजब आहे, तितकचं अजब ते आहे. सोशल मीडियावरील मीम्स आणि जोक्सवरून हे तर स्पष्ट झालंय की, हे एखादं गॅजेट किंवा ॲक्सेसरी नव्हे तर मेंदूशी संबंधित एक्सपेरिमेंटल रिसर्च टूल आहे. हे डिव्हाईस नक्की आहे काय, त्याचं काम काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला जाणून घेऊया…

एका डिव्हाईसने सोशल मीडिया वर खळबळ

राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये कॅमेरा दीपिंदर गोयलच्या चेहऱ्यावर येताच, लोकांना त्यांच्या कानपट्टीजवळ (Temple) एक लहान डिव्हाईस दिसला. त्यावरून सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरू झाली. काहींना वाटलं ते च्युइंगम आहे, तर काहींना के एक्सटर्नल SSD किंवा पिंपल पॅच वाटला. रेडिट आणि इंस्टाग्रामवर तर कॉमेडी कमेंट्सचा महापूर आला. पण खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित होता, की ते डिव्हाईस नेमकं आहे काय आणि ते वापरतात तरी का ?

डिव्हाईसचं नाव काय ?

मेटॅलिक रंगाच्या क्लिपसारख्या या डिव्हाईसचं नावं आहे Temple. हे एक एक्सपेरिमेंटल वेअरेबल आहे जे रिअल टाइममध्ये मेंदूतील रक्तप्रवाह ट्रॅक करते. टेंपल हा आपल्या चेहऱ्यावर, कानपट्टीजवळ घातला जातो. तो मेंदूतील रक्तप्रवाह सतत आणि रिअल टाइममध्ये ट्रॅक करत असतो. मेंदूतील रक्तप्रवाह हा न्यूरोलॉजिकल आरोग्य आणि वृद्धत्वाचा एक प्रमुख सूचक मानला जातो. वाढत्या वयानुसार मेंदूमध्ये होणारे बदल समजून घेण्यासाठी या डेटाचा वापर केला जातो.
पण हे एखाद्या फिटनेस बँड किंवा स्मार्टवॉचप्रमाणे कन्झ्युमर गॅजेट नाहीये.

झोमॅटोपासून वेगळे खाजगी संशोधन लेख

हे स्पष्ट करणे गरजेचं आहे की, Temple हे झोमॅटो किंवा फूड डिलिव्हरीची संबंधित प्रॉडक्ट नाहीये. हे Eternal कडून खाजगीरित्या विकसित केलं जात आहे. दीपिंदर गोयल स्वतः सुमारे एक वर्षापासून हे डिव्हाईस वापरत आहेत. हे संपूर्ण रित्या रिसर्च स्टेजमध्ये असून सध्या मार्केटमध्ये उपलब्झ नाहीये. ते विकण्याचीही काही योजना अजून समोर आलेली नाही. वैज्ञानिक समज वाढवणे हा त्याचा एकमेव उद्देश आहे.

वय आणि गुरुत्वाकर्षण यांचा काय संबंध ?

Temple डिव्हाईसचा थेट संबंध हा दीपिंदर गोयल यांच्या Gravity Ageing Hypothesis शी निगडीत आहे. या सिद्धांतानुसार, मानवी जीवनावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह हळूहळू कमी करतो. कारण मेंदू हा आपल्या शरीराच्या हृदयाच्या वर असतो आणि मनुष्य हा बहुतांश वेळसरळ बरून, उभं राहून घालवतात. त्यामुळे हा परिणाम कित्येत दशकांपासून वाढत जातो. यामुळे मेंदूचे वृद्धत्व वाढते, ज्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.

225 कोटी खर्च

हा रिसर्च पुढे नेण्यासाठी, दीपिंदर गोयल यांनी ‘कंटिन्यू रिसर्च’ नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी या उपक्रमात अंदाजे 225 कोटी रुपये गुंतवले आहेत. हा उपक्रम कंपनीचा सीईओ म्हणून सुरू करण्यात आला नव्हता, तर फक्त एक जिज्ञासू व्यक्ती म्हणून सुरू करण्यात आला होता, असं त्यांनी नमूद केलं. या संशोधनात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांशी व्यापक चर्चा आणि अभ्यास यांचा समावेश होता.