Youtuber Death | 14 लाख सब्सक्राइबर असलेल्या युट्यूबरचा एका स्टंटमुळे घात, पदरात 6 महिन्याच मूल
Youtuber Death | जे व्हायला नको होतं, तेच घडलं. एका स्टंटने संपवल आयुष्य. दीड वर्षापूर्वीच निशुच लग्न झालेलं. त्याला मुलगा 6 महिन्याचा आहे. त्याचे वडिल शेतकरी आहेत.
नवी दिल्ली : प्रसिद्ध होण्यासाठी सध्याच्या जमान्यात लोक बरच काही करत असतात. सोशल मीडियावर रील्स अपलोड करण्याच व्यसन युवा वर्गाला लागलय. रील्समध्ये काही युवक डान्स करतात, तर काही स्टंटबाजी दाखवातत. पण ही स्टंटबाजी भारी पडू शकते. याच ताज उदहारण म्हणजे 22 वर्षाचा निशू देशवाल आहे. हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील निशु देशवाल सोशल मीडियावर भरपूर एक्टिव होता. त्याच्या यूट्यूब वीडियोजला भरपूर व्यूज यायचे.
निशुच्या स्टंटबाजीच्या व्यसनामुळे एक हसत-खेळत कुटुंब उद्धवस्त झालं. निशु ट्रॅक्टरवर स्टंट करताना व्हिडिओ बनवत होता. पण त्याचा हा स्टंटच एकदिवस त्याच्या मृत्यूच कारण बनेल, याचा विचार त्याने कधी केला नसेल. निशु देशवालचा स्टंट सुरु असताना अचानक तो स्टंट त्याच्या जीवावर बेतला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात एक युवक ट्रॅक्टरची पुढची दोन चाक उचलून बॅलन्स करताना दिसतोय.
नुकतच लग्न झालेलं, 6 महिन्याचा मुलगा
अचानक ट्रॅक्टर मागच्या बाजूला पलटला. युवक स्टेरिंग आणि सीटच्यामध्ये अडकला. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दीड वर्षापूर्वीच निशुच लग्न झालेलं. त्याचा मुलगा 6 महिन्याचा आहे. निशु देशवाल दोन भावंडांमध्ये लहान होता. त्याचे वडिल शेतकरी आहेत. 22 वर्षाचा निशु रील बनवण्यासाठी मित्रांसोबत नदी किनारी गेला होता. निशु एक स्टंटमॅन होता.
एकदिवस हा स्टंटच….
यूट्यूबवर निशुच HR-PB Tractors नावाच एक चॅनल होतं. यूट्यूबवर त्याचे 13 लाख 60 हजार फॉलोअर्स होते. यूट्यूबरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय. अनेकदा तो स्टंट करताना व्हिडिओ शेअर करायचा. पण एकदिवस हा स्टंटच त्याच्या मृत्यूच कारण ठरला.