जया प्रदा कोणत्या प्रकरणात अडकल्या, ते प्रकरण कोणतं?, फरार होण्यापर्यंत असं काय घडलं?

Jaya Prada : अभिनेत्री आणि खासदार जया प्रदा या चांगल्याच चर्चेत दिसत आहेत. हेच नाही तर जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. जया प्रदा यांना कोर्टाने थेट फरार घोषित केले. हेच नाही तर यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय.

जया प्रदा कोणत्या प्रकरणात अडकल्या, ते प्रकरण कोणतं?, फरार होण्यापर्यंत असं काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 01, 2024 | 11:20 AM

मुंबई : अभिनेत्री जया प्रदा यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. हेच नाही तर जया प्रदा या राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय असून त्या खासदार आहेत. मात्र, सध्या जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. जया प्रदा यांना थेट कोर्टाने फरार घोषिक केलंय. जया प्रदा यांना अटक करण्यासाठी खास टीमही तयार करण्यात आलीये. याबाबतचे आदेश थेट कोर्टाकडूनच देण्यात आलेत. उत्तरप्रदेश आणि मुंबईला टीमही रवाना झाल्या आहेत. काही ठिकाणी जया प्रदा यांना अटक करण्यासाठी छापेमारीही सुरू आहे.

कोर्टाने जया प्रदा यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आता जया प्रदा यांच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ होताना दिसत आहे. 2019 मधील प्रकरण जया प्रदा यांच्या चांगलेच अंगलट येताना दिसत आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक जया प्रदा यांनी भाजपाकडून लढली होती. जया प्रदा यांच्या विरोधात समाजवादी पार्टीचे आजम खान होते.

जया प्रदा यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले. यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. आचारसंहिता असताना त्यांनी नूरपुर गावाच्या रस्त्याचे उद्धाटन केले. मिश्रगांवमध्ये त्यांनी प्रचार सभेवेळी आपत्तीजनक टिप्पणी केल्याचे देखील त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणात देखील गुन्हा हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणातील सुनावणीस जया प्रदा कधीच हजर राहिल्या नाहीत. सात वेळा त्यांच्या विरोधात वारंट जारी करण्यात आले. तरीही त्या कोर्टात हजर झाल्या नाहीत. आता कोर्टाने जया प्रदा विरोधात कठोर कारवाई करत थेट त्यांना फरार घोषित केले. कोर्टाने रामपुर पोलिस अधिक्षकांना जया प्रदा यांना कोर्टात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

6 मार्च 2024 ला जया प्रदा यांना कोर्टात हजर करायचे आहे. अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी म्हटले आहे की, जया प्रदा यांच्याविरुद्ध निवडणूक आचारसंहिता भंगाचे प्रकरण रामपूर येथे सुरू आहे. कितीतरी वेळा त्यांच्या विरोधात समन्स पाठवण्यात आलंय. मात्र, असे होऊनही त्या कोर्टात सुनावणीसाठी उपस्थित राहिल्या नाहीत.

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.