आम्ही लग्नाळू ! 2000 तरुणींना लावला मस्का, सर्वांनीच नाकारले, कंटाळून केले मग असे काही की, आता अनेक जोडपी देतात दुवा

Marriage Bureau Dating Agency : हा पठ्ठ्या जणू आम्ही लग्नाळू संघटनेचा पदसिद्ध अध्यक्षच होता. एक, दोन, दहा, शंभर, हजार नव्हे तर तब्बल 2000 तरुणींना लग्नासाठी त्याने मागणी घातली, पण त्याच्या पदारात नकार पडला, मग त्याने मोठा निर्णय घेतला...

आम्ही लग्नाळू ! 2000 तरुणींना लावला मस्का, सर्वांनीच नाकारले, कंटाळून केले मग असे काही की, आता अनेक जोडपी देतात दुवा
| Updated on: Feb 16, 2025 | 4:38 PM

Yoshio Marriage Laboratory : आम्ही लग्नाळू, अशी कोणतीही संघटना नसली तरी समाजात लग्नाळूंची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने अनेक जण चिंतेत आहेत. त्यांचे आई-वडिल त्याहून अधिक चितेंत आहेत. या पठ्ठ्याच्या जीवनात पण असेच काही तरी घडले. एक, दोन, दहा, शंभर, हजार नव्हे तर तब्बल 2000 तरुणींना लग्नासाठी त्याने मागणी घातली, पण त्याच्या पदारात नकार पडला, मग त्याने मोठा निर्णय घेतला…

फिर भी ना मिला सजना

योशियो याला लग्न करायचे होते. त्याने पहिली मुलगी पाहिली. दुसरीला भेटायला गेला. ही हॉटेल, हा कॅफे, तो बगीचा, रेल्वे स्टेशन, अशी कोणतीही जागा त्याने सोडली नाही, जिथे त्याने मुलीची भेट घेतली नाही आणि तिला लग्नाचा प्रस्ताव दिला नाही. त्याने जवळपास 2000 तरुणींना लग्नासाठी मागणी घातली आणि नकार पचवला. त्याला इतर तरुण-तरूणीची अचानक काळजी वाटू लागली. आपल्यासोबत जे घडलं ते कुणाच्याच म्हणून वाट्याला यायला नको, म्हणून मग या पठ्ठ्याने दोन जीवांना एकत्र आणण्यासाठी डेटिंग एजन्सी सुरू केली. 44 व्या वर्षाच्या योशियो याने साथीदाराच्या शोधात 8 वर्षे घालवली.

2000 तरुणींना भेटून सुद्धा जोडीदार नाही

South China Morning Post च्या वृत्तानुसार, योशियो याने विज्ञान शाखेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यानंतर त्याने जीवनसाथीचा शोध सुरू केला. तो आई-वडिलांसोबत राहतो. त्याचे वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपये आहे. तरीही त्याला 15 वर्षे त्याचा मनाजोगा जोडीदार भेटला नाही. त्याने विविध प्लॅटफॉर्मवर जवळपास 2000 तरुणींशी चर्चा केली. त्यातील कित्येकींना तो स्वत: जाऊन भेटला. पण कमी कमाई आणि आई-वडिलांसोबत राहत असल्याने त्याला अनेक मुलींनी नकार दिला. अनेक मैत्रिणींनी त्याला सोशल मीडियावर बॅन केले. तर त्याचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला.

स्वतःच उघडला मॅरेज ब्युरो

जवळपास 15 वर्षानंतर त्याला ती मुलगी भेटलीच. तिच्याशी त्याचे लग्न झाले. त्याला एक मुलगा पण आहे. त्यानंतर त्याने त्याच्या अनुभवावरून एक डेटिंग एजन्सी सुरू केली. Yoshio Marriage Laboratory या नावाने त्याने दोघांना जोडण्यासाठी एजन्सी सुरू केली. या माध्यमातून तो डेटिंग दरम्यान येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय सांगतो. यासाठी तो एक नया पैसा सुद्धा घेत नाही. सोशल मीडियावर त्याची ही कहाणी एकदम व्हायरल झाली. त्यानंतर त्याच्या गोष्टीवर कमेंटचा पाऊस पडला आहे. इतक्या डेटवर न जाता तरुणांनी अधिक कमाईवर लक्ष दिले तर मुली मागे फिरतील असा सल्ला त्याने दिला आहे.