‘माझ्याशी लग्न करायचे तर मग द्यावा लागेल टॅक्स!’ तरूणीची अजब मागणी, या कामासाठी हवी तिला नवऱ्याची कमाई
Brazil Model Demand : प्रत्येक व्यक्तीला वाटते की तिला, त्याला एक चांगला साथीदार मिळावा. लग्नात प्रेम ही पहिली पायरी असते. पण ब्राझीलच्या या मॉडेलची पहिली अपेक्षा पैसा ही आहे.

प्रत्येक व्यक्तीला वाटते की तिला, त्याला एक चांगला साथीदार मिळावा, तो काळजी करणारा असावा. तो प्रेम करणारा असावा. प्रत्येक लग्न करणाऱ्याची अशीच अपेक्षा असते. लग्नात प्रेम ही पहिली पायरी असते. पण ब्राझीलच्या या मॉडेलची पहिली अपेक्षा पैसा ही आहे. ब्राझीलमधील मॉडेल आणि इन्फ्लूएन्सर कॅरोल रोसलिन (Karol Rosalin) ही इन्स्टाग्रामवर एकदम लोकप्रिय आहे. तिचे 13 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती साओ पाउलो शहरात राहते. ती कायम चर्चेत असते. आता तिने लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्यासाठी होणाऱ्या पतीला तिला कर द्यावा (Woman demand husband tax) लागेल. तिच्या या अजब मागणीने तिच्यावर फिदा असलेले टेन्शनमध्ये आले आहेत.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृ्त्तानुसार, या सुंदर, सुडौल ब्राझिलियन मॉडला लग्न तर करायचे आहे. पण त्यासाठी टॅक्स भरणारा नवरा हवा आहे. दर महिन्याला या भावी नवरोबाला तिला एक ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे. तिने पृष्ठभागाचा आकार तसाच कायम राहावा यासाठी एक खास ट्रेनर नेमला आहे. त्यालाच ती 3 लाख रुपये महिना मोजते. तर तिच्या इतर खर्चाचे आकडे भल्याभल्या अब्जाधीशांना सुद्धा घाम फोडणारे आहेत. AI ने सुद्धा रोसलिन (Perfect Woman’s Body according to AI) ही जगातील सर्वात सुडौल महिला असल्याचा किताब दिला आहे.
द्यावा लागणार टॅक्स




साओ पाउलो येथील कॅरोल ही अनेकदा चर्चेत आहे. तिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो. अनेक जण तिच्याशी लग्न करण्यासाठी एका पायावर तयार आहेत. मग तिने पण होणाऱ्या नवऱ्याला एक खास अट घातली आहे. नवऱ्याला तिला हस्बंड टॅक्स द्यावा लागणार आहे. ही रक्कम कराच्या रुपात असेल. हा पैसा ती तिच्या फिटनेसवर खर्च करणार आहे. ज्या व्यक्तीला इतकी सुंदर, कमनीय बांध्याची पत्नी हवी, त्याला मग त्यासाठीची किंमत मोजण्याची हिंमत पण ठेवावी लागेल, असे कॅरोल म्हणते.
कशावर करणार हस्बंड टॅक्स खर्च
तर कॅरोल ही आठवड्यातून 5 वेळा वेट ट्रेनिंग करते. रोज कॉर्डिओ करते. स्वीट पोटॅटो, कोंबडा, अंडे आणि ओट्स खाते. अनेक पुरूषांना सुंदर, सुडौल, कमनीय बांध्याची बायको हवी असते, पण त्यासाठीचा खर्च उचलण्याची त्यांची तयारी नसते, असे कॅरोल म्हणते. फिट बॉडीसाठी अपार कष्ट तर लागताच पण पैसा पण लागतो, ज्याला हा खर्च परवडेल, कॅरोल त्याच्यासोबत लग्न करणार आहे. आता तिने अट कळवली आहे, पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.