2000 हजारांच्या नोटेवर memes चा मारा!

| Updated on: May 20, 2023 | 6:38 PM

या नोटा कायदेशीर स्वरूपातच राहतील. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, 23 मे पासून कोणताही ग्राहक कोणत्याही बँकेत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी गेला तर त्या नोटा एक्सचेंज करून मिळतील. परंतु एका वेळी फक्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. 23 सप्टेंबरनंतर तुम्हाला बँकांमधून या नोटा बदलता येणार नाहीत.

2000 हजारांच्या नोटेवर memes चा मारा!
2000 note ban
Follow us on

मुंबई: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दोन हजार रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) देशभरातून लवकरच दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. रिझर्व्ह बँकेने बँकांना २००० च्या नोटा जारी न करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या नोटा कायदेशीर स्वरूपातच राहतील. रिझर्व्ह बँकेचे म्हणणे आहे की, 23 मे पासून कोणताही ग्राहक कोणत्याही बँकेत दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी गेला तर त्या नोटा एक्सचेंज करून मिळतील. परंतु एका वेळी फक्त 20 हजार रुपयांच्या नोटा बदलता येतील. 23 सप्टेंबरनंतर तुम्हाला बँकांमधून या नोटा बदलता येणार नाहीत.

आता RBI चा हा निर्णय येताच सोशल मीडियावरही त्याची चर्चा झाली. #2000note ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहे. युजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत आणि मीम्सही शेअर करत आहेत.