स्वयंपाकघरातील या 6 चुका टाळा आणि हे सोपे वास्तू उपाय अवलंबा, घरात वाढेल सकारात्मकता
स्वयंपाकघरातील वास्तुमधील छोट्या चुकांमुळे घरात ताण आणि खर्च वाढू शकतो. तसेच घरातील सकारात्मक ऊर्जा देखील कमी होते. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात की स्वयंपाकघरात कोणत्या 6 चुका टाळल्या पाहिजे.

स्वयंपाकघर हे आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण हीच अशी जागा आहे जी आपल्या कुटुंबाचे आरोग्य, ऊर्जा आणि आनंद जोडून ठेवते. मात्र आपण अनेकदा याच स्वयंपाकघरातील काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे नंतर आपले नकळत मोठे नुकसान होते. वास्तुशास्त्रानुसार जर स्वयंपाकघर योग्यरित्या दिशा आणि वस्तु व्यवस्थित ठेवले असतील तर त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणण्यास मदत करते.
पण जर हेच स्वयंपाकघर खराब असेल व स्वयंपाकघरातील जेवण बनवताना लागणाऱ्या वस्तू अस्ताव्यस्थ पडलेल्या असतील तर त्यामुळे तुमचा तणाव, संघर्ष आणि अनावश्यक खर्च वाढू शकतो. चला तर मग आजच्या लेखात आपण स्वयंपाकघरातील कोणत्या 6 चुका टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे ते जाणून घेऊयात.
1. गॅस शेगडी चुकीच्या दिशेने ठेवणे:
वास्तुशास्त्रानुसार गॅसची शेगडी नेहमी आग्नेय दिशेने ठेवावी, जी अग्निकोण मानली जाते. जर तुम्ही शेगडी उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवली असेल तर त्याने मानसिक ताण आणि आर्थिक समस्या वाढू शकतात. जर दिशा बदलणे शक्य नसेल, तर गॅस शेगडीजवळील भिंतीवर लहान लाल स्टिकर किंवा लाल रंगाची सजावट करा. यामुळे ऊर्जा संतुलित होण्यास मदत होईल.
2. स्वयंपाकघर खराब किंवा अव्यवस्थित ठेवणे:
स्वयंपाकघर खराब किंवा अव्यवस्थित ठेवल्याने केवळ आरोग्यावर परिणाम होत नाही तर नकारात्मक ऊर्जा देखील वाढते. जेवलेली भांडी तशीच ठेवणे, स्वयंपाकघरातील ओटा किंवा जमिनीवर विखुरलेल्या वस्तू घरात तणाव आणि नकारात्मकता वाढवतात. वास्तु तज्ञांच्या मते स्वच्छ आणि व्यवस्थित स्वयंपाकघर सकारात्मक ऊर्जा आणि संतुलित घराचे वातावरण राखते.
3. आग आणि पाणी एकत्र बाजूलाच असणे:
गॅस शेगडी, सिंक किंवा वॉटर फिल्टर एकमेकांजवळ ठेवणे वास्तुमध्ये अशुभ मानले जाते. आग आणि पाण्याच्या उर्जेचा एकमेकांशी संघर्ष होतो आणि त्यामुळे या गोष्टी देखील तुमच्या किचनमध्ये एकत्र असतील तर घरात कौटुंबिक संघर्ष, मतभेद आणि अनावश्यक खर्च होऊ शकतात. जर हे दोन्ही गोष्टी जवळपास असतील तर त्यामध्ये लाकडाचा तुकडा किंवा बोर्ड लावावा.
4. स्वयंपाकघरातील जूनी भांडी, तुटलेले भांडी साठवणे:
स्वयंपाकघरातील वस्तू नीट ठेवणे किंवा जुनी भांडी, रिकामे डबे आणि खराब एक्सपायर झालेले पदार्थ साठवणे वास्तुनुसार अशुभ मानले जाते. यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समस्या उद्भवते. यापासून सुटका मिळवण्यासाठी महिन्यातून एकदा स्वयंपाकघर स्वच्छ करणे आणि अनावश्यक वस्तू काढून टाकणे आवश्यक आहे.
5. योग्य प्रकाश आणि व्हेंटिलेशनचा अभाव:
स्वयंपाकघरात प्रकाश आणि हवेचे योग्य संतुलन असणे अत्यंत महत्वाचे आहे. स्वयंपाकघरात सतत अंधार किंवा खराब व्हेंटिलेशन एनर्जी असेल तर ते घरातील व्यक्तींना कमकुवत करू शकते. दिवसा स्वयंपाकघरात पुरेसा नैसर्गिक प्रकाश आणि व्हेंटिलेशन पोहोचेल याची खात्री करण्याचा प्रयत्न करा.
6. स्वयंपाकघराचा रंग आणि सजावट
स्वयंपाकघरातील रंग देखील उर्जेवर परिणाम करतो. पिवळा, नारंगी आणि हिरवा असे हलके आणि चमकदार रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात. गडद किंवा खिन्न रंग नकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात. तुमच्या स्वयंपाकघरातील सजावटीमध्ये स्वच्छ आणि सकारात्मक चिन्हे असलेल्या वस्तूंचा समावेश करा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
