खरमास 2025: 30 दिवस वाट पाहायला लागू नये म्हणून उरकून घ्या शुभ कार्य
हिंदू मान्यतेनुसार खरमास दरम्यान शुभ कार्य केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. यावर्षी खरमास उद्यापासून सुरू होत आहे, त्यानंतर तुम्हाला 30 दिवस कोणतेही शुभ कार्य करता येणार नाहीये. चला तर मग आजच्या लेखात खरमास कधी सुरू होईल याबद्दल जाणून घेऊयात.

हिंदू धर्मग्रंथांमध्ये खरमास हा अशुभ मानला जातो. तर ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार दर महिन्याला सुर्य देव एका राशीतून दुस-या राशीत संक्रमण करता असतो. अशातच वर्षातून दोनदा जेव्हा सुर्य देव गुरू राशी धनु आणि मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या 30 दिवसांपर्यंत तेथेच राहातात, आणि या कलावधीला खरमास किंवा मलमास असेही म्हणतात. सूर्य जेव्हा धनु राशीत प्रवेश करतो, तेव्हा खरमास सुरू होतो. धनु राशीत प्रवेश केल्यावर सूर्याचे तेज कमी होते. खरमास दरम्यान सर्व शुभ कार्य करण्यास सक्त मनाई असते. विवाह, उपनयन समारंभ आणि गृहप्रवेश समारंभ यासारखे शुभ कार्यक्रम करण्यास मनाई असते.
हिंदू मान्यतेनुसार खरमास काळात शुभ कार्य केल्याने तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळत नाही. या वर्षी खरमास उद्यापासून सुरू होत आहे, त्यामुळे तुम्हाला 30 दिवस कोणतेही शुभ कार्य करता येणार नाही. पुढील महिन्याच्या म्हणजेच 14 जानेवारी 2026 या तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा खरमास संपेल. यानंतर शुभ आणि मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतील.
उद्यापासून सुरू होत आहे खरमास
2025 च्या समाप्तीला खरमास उद्या 16 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजून 19 मिनिटांनी सुरू होईल. यावेळी, सूर्य वृश्चिक राशी सोडून धनु राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे खरमासाची सुरुवात होईल. सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा धनु संक्रांती साजरी केली जाते म्हणून उद्या धनु संक्रांती साजरी केली जाईल. खरमास सुरू झाल्यानंतर कोणतेही शुभ कार्य करता येणार नाही.
खरमासमध्ये शुभ कार्य का केले जात नाही?
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की खरमास दरम्यान सूर्यदेवाचे तेज कमी होते. म्हणून या काळात विवाह, मुंडन, गृहप्रवेश आणि नामकरण यासारखे शुभ समारंभ केले जात नाहीत. हा आत्मनिरीक्षण आणि संयमाचा काळ आहे. हा काळ शुभ कार्यांसाठी शुभ मानला जात नसला तरी, पूजा आणि ध्यानासाठी तो उत्तम मानला जातो.
या महिन्यात भगवान विष्णू, सूर्यदेव आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. खरमास दरम्यान रामनामाचा जप, गीता पाठ आणि विष्णू सहस्रनामाचे पठण देखील करावे. तसेच तुम्ही ज्या देवतांची मनापासून भक्ती करता त्याचे नामस्मरण करत राहावे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
