90 च्या दशकातील डबल मीनिंग गाणं, बघताना देखील लोकांना वाटायची लाज, ज्यामुळे सेन्सॉर बोर्ड पण हादरलं, पण थिएटरमध्ये…
आरे बापरे! 1990 मधील प्रचंड वादग्रस्त गाणं, ज्याचे बोल होते डबल मीनिंग. जे पाहून सेन्सॉर बोर्ड देखील हादरले. पण थिएटरमध्ये लागताच लोक वाजवत होते शिट्या.तुम्ही ऐकलं आहे का?

1990 चं दशक बॉलिवूडसाठी सुवर्णकाळ मानलं जातं. त्या काळात रोमँटिक आणि अॅक्शन चित्रपटांसोबत अनेक गाजलेली गाणीही प्रेक्षकांना ऐकायला मिळाली. आजही त्या काळातील अनेक गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहेत.

मात्र त्या काळात काही गाणी अशीही होती ज्यांच्या शब्दांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अशाच एका गाण्याची आजही चर्चा होते. ते म्हणजे 'अंदाज' या चित्रपटातील 'ये मालगाडी तू धक्का लगा' या गाण्याने त्या काळात मोठी खळबळ उडवली होती.

या चित्रपटात मुख्य भूमिकेत अनिल कपूर आणि जूही चावला दिसले होते. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला, पण या चित्रपटातील एका गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

‘ये मालगाडी तू धक्का लगा, धक्का लगा रे धक्का लगा’ या ओळींमुळे हे गाणं विशेष चर्चेत आलं. गाण्यातील नृत्य, हावभाव आणि सादरीकरण यामुळे त्या काळात अनेकांनी त्यावर टीका केली. या गाण्याच्या बोलांमध्ये डबल मीनिंग असल्याचा आरोप अनेकांनी केला होता. अनेकांनी हे गाणं अश्लील असल्याचे म्हटले.

त्या काळात या गाण्यामुळे सेन्सॉर बोर्डालाही धक्का बसल्याची चर्चा झाली होती. तर काही महिला संघटनांनीही या गाण्याचा विरोध करत बंद करण्याची मागणी केली होती.

वाद निर्माण झाला असला तरी थिएटरमध्ये या गाण्याला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. चित्रपटगृहांमध्ये हे गाणं लागलं की प्रेक्षक शिट्ट्या मारत आणि मोठ्या उत्साहात त्याचा आनंद घेत होते.