लग्नातील मजेशीर बॉण्डिंग; नवरोबाच्या मित्रमंडळींमुळे वधूने या करारावर केली स्वाक्षरी

| Updated on: Nov 10, 2022 | 11:32 PM

एका लग्नामध्ये वराच्या मित्रमंडळींनी वधूला मजेशीर कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करायला लावली. लग्नातलं हे मजेशीर बॉण्डिंग सोशल मीडियामध्ये व्हायरल नाही झालं तर नवल.

लग्नातील मजेशीर बॉण्डिंग; नवरोबाच्या मित्रमंडळींमुळे वधूने या करारावर केली स्वाक्षरी
लग्नातील मजेशीर बॉण्डिंग
Image Credit source: social
Follow us on

लग्न ही खरंतर एक नात्यातील बांधिलकी. संसाराचे एक बंधन. काहीजण या लग्नाला सात जन्माचा करारही मानतात. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात नातेसंबंधही कधी दुरावतील हे सांगता येत नाही. विशेषतः प्रापंचिक जीवनामध्ये अनेकदा कटू अनुभव येत असतात. याच पार्श्वभूमीवर सध्या लग्नाच्या आधी बरेच दांपत्य एकमेकांना करारबद्ध करू लागले आहेत. कोण कुठला करार करेल याचा नेम नाही. बरेच दांपत्ये मजेशीर करार करू लागले आहेत. अशा मजेशीर करारांची सोशल मीडियामध्ये चांगली चर्चा होत आहे. काही वेळेला वधूकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेतली जातात तर काही वेळेला वर पक्षही कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यात माघार घेत नाही. ही कॉन्ट्रॅक्ट पाहून बरेच जण चक्रावून जातात.

केरळमधील अशीच एक मजेशीर लग्नाची गोष्ट समोर आली आहे. एका लग्नामध्ये वराच्या मित्रमंडळींनी वधूला मजेशीर कॉन्ट्रॅक्टवर स्वाक्षरी करायला लावली. लग्नातलं हे मजेशीर बॉण्डिंग सोशल मीडियामध्ये व्हायरल नाही झालं तर नवल.

सप्तपदीआधी कॉन्ट्रॅक्ट पेपर

लग्नामध्ये सप्तपदी घेतली जाते. ही खरंतर वधू-वराने घेतलेली सात जन्माची शपथ असते. केरळच्या लग्नामध्ये वधू-वर सप्तपदी घेण्याआधीच नवरोबाच्या मित्रांनी कॉन्ट्रॅक्ट पेपर साइन करून घेतला. नवरोबाच्या मित्रमंडळींनी गिफ्टच्या रूपात वधूला ‘कॉन्ट्रॅक्ट लेटर’ दिले.

हे सुद्धा वाचा

या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर मित्रमंडळींनी बऱ्याच अटी-शर्ती लिहिल्या होत्या. आपला मित्र बायकोच्या तावडीत सापडून आपल्यापासून दुरावू नये, मित्राने पूर्वी इतकाच आपल्याला वेळ द्यावा, या अनुषंगाने कॉन्ट्रॅक्ट लेटरमध्ये अटी घालण्यात आल्या होत्या.

या अटी पाहिल्यानंतर काही क्षण वधूला धक्काच बसला. नंतर लग्न मंडपातील वऱ्हाडी देखील कॉन्ट्रॅक्ट लेटरची चर्चा करू लागले. हेच कॉन्ट्रॅक्ट लेटर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर वायरल होत आहे.

कॉन्ट्रॅक्ट पेपरवर वधूसाठी लागू केलेल्या अटी

नवरोबाच्या मित्रमंडळींनी स्टॅम्प पेपरवर कॉन्ट्रॅक्टच्या बऱ्याच अटी लिहिल्या होत्या. लग्नानंतर ही माझ्या पतीला रात्री नऊपर्यंत मित्रमंडळीसोबत राहण्यास परवानगी असेल, मी या अवधीत पतीला कॉल करून अजिबात डिस्टर्ब करणार नाही असे वचन या ठिकाणी देत आहे, अशा मजेशीर अटी कॉन्ट्रॅक्ट पेपरवर नोंदवून वधूची स्वाक्षरी घेण्यात आली.

सोशल मीडियावर आयडियाला पसंती

सध्या हे कॉन्ट्रॅक्ट लेटर सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात आहे. अनेक लोकांना ही आयडिया भारी आवडली असून ते देखील आपल्या मित्राच्या लग्नात असा प्रयोग करून पाहणार आहेत. सोशल मीडियातील कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी ही इच्छा व्यक्त केली आहे.