Video: मला माझ्या ‘डॉगी’सारखं दिसायचंय म्हणत चिमुकलीने केला मेकअप, पाहा खळखळून हसायला लावणारा व्हीडिओ…

| Updated on: Apr 16, 2022 | 12:18 PM

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एका व्हीडिओची जोरदार चर्चा आहे. यात ही लहान मुलगी तिच्या आवडत्या कुत्र्याप्रमाणे दिसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या आईच्या मेकअप किटचा वापर करतेय.

Video: मला माझ्या डॉगीसारखं दिसायचंय म्हणत चिमुकलीने केला मेकअप, पाहा खळखळून हसायला लावणारा व्हीडिओ...
लहान मुलीचा व्हीडिओ व्हायरल
Follow us on

मुंबई : घरातील पाळीव प्राणी (Pets) आणि लहान मुलांमध्ये एक वेगळंच नातं असतं. त्यांच्यामध्ये नेगळ्या प्रकारचा जिव्हाळा असतो. या प्राण्यांवर चिमुकल्यांचा जीव असतो. त्यांच्या शिवाय या चिमुरड्यांना राहावत नाही. सध्या असाच एका लहान मुलीचा (A little girl) आणि तिच्या घरातील कुत्र्याचा जिव्हाळा सांगणारा एक व्हीडिओ व्हायरल सध्या (Viral Video) होत आहे. यात ही लहान मुलगी तिच्या आवडत्या कुत्र्याप्रमाणे दिसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या आईच्या मेकअप (Makeup) किटचा वापर करतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एका व्हीडिओची जोरदार चर्चा आहे. यात ही लहान मुलगी तिच्या आवडत्या कुत्र्याप्रमाणे दिसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या आईच्या मेकअप किटचा वापर करतेय.या चिमुकलीच्या घरात फ्रान्सिस्को नावाचा कुत्रा आहे. त्याच्या डोळ्यांचा आणि नाकाचा रंग काळा आहे. तसाच मुलगीही तिच्या डोळ्यांवर आणि नाकावर काळ्या रंगाचं वर्तुळ करून चेहरा रंगवताना दिसतेय. या व्हीडीओमध्ये या मुलीची आई तू मेकअप का करत आहेस असं विचारते. तेव्हा त्यावर ही चिमुकली म्हणते,मला माझ्या कुत्र्यासारखं दिसायचं आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर 20 लाखांहून अधिक लोकांनी या व्हीडिओला लाईक केलं आहे. अनेकांनी या व्हीडिओवर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. किती क्युट आहे ही मुलगी असं अनेकजण म्हणताना पाहयला मिळत आहेत. तर लहान मुलं निरागस असतात. किती निरागसतेने ही मुलगी मेकअप करतेय. असं ही एका नेटकऱ्याने म्हटलंय.

संबंधित बातम्या

Video : गोरिलाची पासष्ठी, केक खात 65 वा वाढदिवस साजरा, हॅपी बर्थ डे गोरिला!

कोव्हीड पोर्टलऐवजी पॉन साईटची लिंक शेअर, आरोग्य मंत्रालयाचा भोंगळ कारभार!

Video : शेतकऱ्याने दिलं नाग-नागिनीच्या जोडीला जीवदान, परिसरात कौतुक…