VIDEO | बैल घोड्यासारखा वेगाने पळतोय, पाठीवर एकजण बसलाय, नेटकरी म्हणतात…

VIRAL VIDEO | ग्रामीण भागात सुरु असलेली बैलगाडा शर्यत सगळ्यांना व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती बैलाच्या अंगावर बसून वेगाने निघाली आहे. काय प्रकार आहे, त्यासाठी एकदा व्हिडीओ पाहा.

VIDEO | बैल घोड्यासारखा वेगाने पळतोय, पाठीवर एकजण बसलाय, नेटकरी म्हणतात...
Bull Ride
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 08, 2023 | 8:47 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) रोज नवे व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ असे असतात की, ते पाहिल्यानंतर अनेकांचा दिवस चांगला जातो. त्यामुळे असे व्हिडीओ लोकं शोधत असतात. काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की लोकांना सुध्दा त्याचं आश्चर्य वाटतं. काही लोकं एखादा व्हिडीओ आवडल्यानंतर पुन्हा-पुन्हा पाहतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये रात्रीचा एक बैल वेगाने धावत आहे, त्यावर एक व्यक्ती बसला आहे. हा व्हिडीओ रस्त्यात असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. अनेक नेटकऱ्यानी कमेंटमध्ये प्रश्न केला आहे की, बैल सवारी (Bull Ride) करणारा व्यक्ती नेमका कोण आहे.

कैलाशपती नाथांची स्तुती

व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडीओमध्ये रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती बैलाच्या पाठीवर बसली आहे. त्याचबरोबर बैल घोड्यासारखा पळत आहे. बैलगाडा शर्यत अनेकदा आपण मोबाईलमध्ये पाहत असतो. परंतु बैल अशा पद्धतीने पळताना कधी पाहिलाय का ? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या डोळ्यावर विश्वास बसेना अशी स्थिती आहे. काही लोकांनी हा बैल नाही, तर घोडा आहे असं म्हटलं आहे. नेटकरी त्या बैलाला आणि व्यक्तीला पाहून हैराण झाले आहेत. बैलावर बसलेली व्यक्ती देखील कैलाशपती नाथांची स्तुती करत आहे.

बैल इतका शांत कसा काय ?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणतो की, बैलावर बसून हा व्यक्ती इतक्या आरामात कसं काय काम करु शकतो. विशेष म्हणजे अंगावर एक व्यक्ती बसलेली तरी सुध्दा बैलाला राग आलेला नाही. हा व्हिडीओ ट्विटरवरती @copkumargaurav या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, कबीरा, तुमच्या देशात विविध प्रकारचे लोक आहेत! हा व्हिडीओ आतापर्यंत 74 हजार लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला मजेशीर कमेंट येत आहेत.