Viral Video: संतप्त किंग कोब्राचा माणसावर हल्ला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!

King Cobra Attack Viral Video: किंग कोब्राचा पलटवार खरंच थरारक आहे, पण ज्या पद्धतीने सर्पमित्राने या १२ फूट लांबीच्या खतरनाक सापावर नियंत्रण मिळवलं, ते पाहण्यासारखं आहे. जणू तो त्याचा पाळीव प्राणी आहे!

Viral Video: संतप्त किंग कोब्राचा माणसावर हल्ला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल!
cobra-attack
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Sep 04, 2025 | 2:19 PM

सापाचे नाव जरी घेतले तरी अनेकांचा थरकाप उडतो. सापांशी संबंधित व्हिडओ (Snake Videos) सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, पण आता ज्या व्हिडओने सर्वांच लक्ष वेधल आहे. हा व्हिडीओ पाहून खरंच तुमचा थरकाप उडेल. सोशल मीडियावर या व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पृथ्वीवरील सर्वात खतरनाक आणि विषारी सापांपैकी एक असलेल्या किंग कोब्रासोबत (King Cobra Snake Viral Video) मजा करताना दिसत आहे. पण पुढच्याच क्षणी व्हिडओत जे काही घडलं, ते काळजाचा ठोका चुकवणारे आहे. या व्हिडओला ८.८ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

काय आहे व्हिडीओ?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडओत दिसणारी ही व्यक्ती दुसरी कोणी नसून, प्रसिद्ध सर्पमित्र मुरलीवाला हौसला (Murliwale Hausla) आहे. तो वाचवलेल्या एका मोठ्या किंग कोब्राला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी आला आहे. व्हिडओत तुम्ही पाहाल की, जेव्हा कोब्रा पिशवीतून बाहेर येतो, तेव्हा तो लगेच फणा काढून सर्पमित्रासमोर उभा राहतो.

किंग कोब्राचं हे रूप खरंच थरकाप उडवणारं आहे, पण ज्या पद्धतीने सर्प मित्राने या १२ फूट लांबीच्या खतरनाक सापावर नियंत्रण मिळवलं, ते पाहण्यासारखं आहे. जणू तो त्याचा पाळीव प्राणी आहे. व्हिडओत तुम्ही पाहाल की, किंग कोब्रा रागात येऊन अनेकदा सर्प मित्रावर हल्ला करतो. हा प्रसंग खरंच श्वास रोखून धरायला लावणारा आहे. पण सर्प मित्र निर्भयपणे त्यावर नियंत्रण मिळवतो आणि थोडी मजा केल्यानंतर त्याला जंगलात सोडतो.

येथे पाहा संतप्त किंग कोब्राच्या हल्ल्याचा थरारक व्हिडिओ

८८ लाख वेळा पाहिला गेला हा व्हिड

हा व्हिडओ जरी बराच जुना असला, तरी सोशल मीडियावर तो अजूनही ट्रेंड करत आहे आणि नेटकरी यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडओला आतापर्यंत ८८ लाखांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे आणि १ लाख ८८ हजारांहून अधिक लोकांनी याला लाइक केल आहे.