VIDEO : एका पायाने अपंग तरुणीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल, पहा काय आहे या व्हिडिओमध्ये

तरुणीचा हा प्रेरणादायी व्हिडिओ एका युजरने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अपंग महिला जिममध्ये वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO : एका पायाने अपंग तरुणीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल, पहा काय आहे या व्हिडिओमध्ये
एका पायाने अपंग तरुणीचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच प्रेरणा मिळेल
Image Credit source: social
| Updated on: Nov 08, 2022 | 10:13 PM

प्रबळ आत्मविश्वास असेल तर माणूस कोणत्याही अडचणींवर मात करु शकतो असे म्हणतात. याचाच प्रत्यय एका व्हिडिओवरुन येतोय. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाय नसलेली अपंग तरुणी वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. तरुणीचा एक पाय निसर्गाने हिरावून घेतला असला तरी तिची इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास तिच्या अपंगत्वावर मात करताना दिसत आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

तरुणीचा हा प्रेरणादायी व्हिडिओ एका युजरने आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक अपंग महिला जिममध्ये वेटलिफ्टिंग करताना दिसत आहे. हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडिओला 34 लाखांहून अधिक व्ह्यूज

या व्हिडिओला आतापर्यंत 34 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. संकटांना घाबरणाऱ्या आणि परिस्थितीसमोर हार मानणाऱ्या लोकांसाठी ही तरुणी म्हणजे एक प्रेरणास्थान बनली आहे.

तरुणीचा उत्साह पाहून सर्वच अवाक्

तरुणीला एकच पाय आहे, पण तिच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसत नाही. दोन्ही हातांच्या बळावर तिने वजन उचलताच बघणारेही थक्क झाले. इच्छाशक्ती, मनोबल आणि आत्मविश्वास याच्या जोरावर महिला सक्षम लोकांना टक्कर देण्यास तयार आहे.

शारिरीक क्षमता, सर्व सुखसोयी असूनही लोकं अडचणींना घाबरतात. मात्र हा व्हिडिओ पाहून या सर्व लोकांना अडचणींचा सामना करण्यासाठी प्रेरणा मिळेल. महिलेने जे केले ते महिनोंमहिने मेहनत घेऊनही सामान्य लोकांना जमत नाही.