AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तान 100 टक्के दहशतवादी देश, ऑस्ट्रेलियातील हल्ल्यानंतर जगभरात संताप, पाकड्यांनी..

ऑस्टेलियात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्याचे कनेक्शन थेट पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे पाकिस्तानचा पुन्हा एकदा बुरखा जगासमोर फाडला आहे. ऑस्टेलियात हल्ला करणारे नागरिक पाकिस्तानी होते.

पाकिस्तान 100 टक्के दहशतवादी देश, ऑस्ट्रेलियातील हल्ल्यानंतर जगभरात संताप, पाकड्यांनी..
terrorist attack Australia
| Updated on: Dec 16, 2025 | 10:57 AM
Share

पाकिस्तानी नागरिक असलेल्या बाप लेकांनी मोठा हल्ला ऑस्ट्रेलियात केला. या हल्ल्याचे काही व्हिडीओही पुढे आली आहेत. दोघे फळ विक्रीचा व्यवसाय ऑस्ट्रेलियात करत. फिरण्यासाठी जात असल्याचे कुटुंबियांना सांगून त्यांनी थेट मोठा दहशतवादी हल्ला केला. ज्यात 16 ऑस्ट्रेलियान नागरिक ठार झाले. त्यामध्येच ऑस्ट्रेलियाच्या एका नागरिकाने प्राणाची बाजी लावत चक्क दहशतवाद्यावर झडप मारत त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली. यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला. व्हिडीओमध्येही स्पष्टपणे दिसत होते की, एका व्यक्तीने दहशतवादी गोळीबार करत असताना मागून त्याच्यावर झडप घातली आणि थेट त्याच्या हातातील बंदूक हिसकावून घेतली आणि त्याच्यावरच गोळीबार केला. यातील एक दहशतवादी इस्लामी केंद्रात जात असल्याची माहिती पुढे आली. सध्या ऑस्ट्रेलियाच्या तपास यंत्रणांकडून याबद्दलचा तपास केला जात आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने या हल्ला दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले. ऑस्ट्रेलियातील या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानातील दहशतवाद पुढे आला आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यामध्ये हात असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगितले जात आहे. उजव्या विचारसरणीचे नेते आणि खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्याच्या संदर्भात पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे.

खासदार गीर्ट वाइल्डर्स यांनी म्हटले की, पाकिस्तान हा शरिया कायद्यानुसार चालणारा एक अत्यंत धोकादायक आणि मागासलेला देश आहे. हा हल्ला करून त्याने पुन्हा एकदा जगाला याची आठवण करून दिली. कुख्यात अल-कायदा दहशतवादी ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपून बसला होता. एक्सवर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटले की, पाकिस्तान हा 100 टक्के दहशतवादी देश आहे.

शरियासारख्या धोकादायक कायद्या असलेला हा एक नक्कीच नीच देश आहे. मला पाकिस्तानी मौलवींंकडून अनेक धमक्या मिळाल्या आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना पाठिंबा दिला जातो, हे जगजाहीरच आहे. भारतामध्येही विविध दहशतवादी कारवाई करण्याचा प्रयत्न पाकिस्तानातून केला जातो. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनीच मोठा हल्ला केला होता. त्यात पर्यटकांना धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या.

खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.