AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्यजित तांबे यांना मोठा दणका! रास्ता रोको आंदोलन करणं भोवलं, तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल

Satyajit Tambe : आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. आता तांबे यांच्यासह 300 पेक्षा जास्त आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सत्यजित तांबे यांना मोठा दणका! रास्ता रोको आंदोलन करणं भोवलं, तांबेंसह 300 आंदोलकांवर गुन्हा दाखल
Satyajit tambe Rasta Roko FIRImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 09, 2026 | 10:12 PM
Share

नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पावरून आज अहिल्यानगरमध्ये वातावरण तापलं होते. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा, या मागणीसाठी आज सकाळी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीर आंदोलन केल्याप्रकरणी आमदार सत्यजित तांबे यांच्यासह व इतर 300 ते 350 आंदोलकांवर वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सत्यजित तांबे यांच्यासह 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल

आज विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह गोंदे शिवारात मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग व नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार नाशिक-सिन्नर-संगमनेर-चाकण मार्गे व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र आता या आंदोलनानंतर तांबे यांच्यासह इतर आंदोलकांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. वावी पोलिस ठाण्यात तांबे यांच्यासह 300 ते 350 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते सत्यजित तांबे ?

आजच्या आंदोलनावेळी बोलताना आमदार तांबे यांनी म्हटले होते की, नाशिक-पुणे रेल्वेसाठी नागरिक आणि तरुण रस्त्यावर उतरले आहेत. ज्या मार्गाने रेल्वे ठरली त्यात बदल होऊ नये ही मागणी आहे. 500 कोटी पेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. प्रांत शशिकांत मंगरुळे चर्चेसाठी आले, 22 फेब्रुवारी 2026 ला रेल्वेसाठी प्रश्न मांडला, त्यानुसार समिती नेमली आहे. आम्ही दोन मागण्या केल्या आहेत. काकोडकर समितीला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देता कामा नये. काकोडकर यांना शास्त्रज्ञ म्हणून नेमले आहे, दोन विभागीय आयुक्त दिले आहेत, रेल्वे बोर्डाचा अधिकारी सुद्धा नेमला आहे. जनभावनेचा विचार केला जावा, फक्त तांत्रिक कारणांचा विचार करू नये आणि ठरल्याप्रमाणे हा मार्ग जुन्याच आराखड्याने व्हावा अशी आमची मागणी आहे. समृद्धी महामार्गावर सुद्धा आंदोलन झालं, नागरिकांना त्रास देणे आमचा हेतू नव्हता.  शासनाच्या माध्यमातून आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद