AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं

निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं

| Updated on: Sep 24, 2026 | 12:07 PM
Share

राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून आयोगाची स्वायत्तता केवळ कागदावरच उरल्याचा आरोप केला आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी जनतेने आंदोलन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका ट्विटद्वारे त्यांनी ही टीका केली. आयोगाची स्वायत्तता केवळ पुस्तकांपुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरे यांच्या मते, केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांना गुंडाळून ठेवण्यात आले आहे.

गेल्या दहा महिन्यांत या दोन आयुक्तांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर चौदा वेळा ताशेरे ओढले, तरीही आयोगाने आपलेच निर्णय पुढे रेटले. ज्ञानेश कुमार हे फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त झाले, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या कार्यकाळात बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही राज्य निवडणूक आयोग दिल्लीकडे डोळे लावून बसतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

Published on: Sep 24, 2026 12:07 PM

Follow Us