AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्याची लायकी काढली, एकदा तुम्ही जनतेतून..

Omraje Nimbalkar Uddhav Thackeray: खासदार ओमराजे निंबाळकरांनी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांच्या एका शिलेदारावर जहरी टीका केली. त्यांनी पहिल्यांदाच उद्धव सेनेवर हल्लाबोल चढवला. काय म्हणाले निंबाळकर?

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकरांनी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या बड्या नेत्याची लायकी काढली, एकदा तुम्ही जनतेतून..
ओमराजे निंबाळकर, उद्धव ठाकरे
| Updated on: Sep 24, 2026 | 1:59 PM
Share

श्रीराम क्षीरसागर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी:  या जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सहा खासदारांनी ठाकरे सेनेची साथ सोडली. त्यात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. तेव्हापासून निंबाळकरांनी उद्धव सेनेवर टीका केली नाही. पण आता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टीकेला त्यांनी सणसणीत उत्तर दिले. त्यांनी उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. त्यांनी दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अंबादास दानवे यांच्यावर खरमरीत टीका

ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची लायकी काढत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी टीका केली. दानवेंच्या सोशल मीडियावरील पोस्टला ओमराजे यांनी प्रत्युत्तर दिले. 2029 ला धाराशिवमधून निवडणूक लढवण्याचं आव्हान त्यांनी दिले. एकदा जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे स्वतःची लायकी कळेल, अशी टीका त्यांनी केली. काही लोकांना काहीच काम नाही, उठायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट करायची, असा टोला त्यांनी लगावला. एक दिवस माझ्यासोबत या आणि मी जेवढे फोन उचलतो, त्याच्या दहा टक्के तुम्ही फोन घेऊन दाखवा, असं आव्हानही ओमराजेंनी दानवेंना दिलं. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यातील फोटो एक्सवर पोस्ट करत अंबादास दानवे यांनी “काय होतास तू काय झालास तू “अशी टीका केली होती. त्यावर निंबाळकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

राणा पाटील यांच्यासोबत एकत्र प्रवास

मुख्यमंत्र्यांच्या वाहनात राणा पाटील यांच्यासोबत प्रवास करण्याबाबत ओमराजेंनी स्पष्टीकरण दिलं. जिल्ह्यातील शेतकरी, पाण्याचा प्रश्न आणि पीक विम्याच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांशी थेट बोलण्यासाठी मी गाडीत बसलो, त्या गाडीमध्ये मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पालकमंत्री प्रताप सरनाईकही असल्याचं ओमराजेंनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना बोलायचं म्हटलं तर कोणाचं तोंड बघण्याची गरज पडत नाही, असं म्हणत ओमराजेंनी राणा पाटील यांच्यासोबतच्या प्रवासाचं राजकीय स्पष्टीकरण दिलं.

कैलास पाटील यांची दौऱ्यावर टीका

दोरखंड बांधण्याची काय गरज होती? शेतकरी दंगल करायला आले नव्हते. मुख्यमंत्री हे राज्याचे आहेत कुठल्या पक्षाचे आहेत म्हणून आम्ही आलो नव्हतो, अशी टीका उद्धव सेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली. शेतकर्‍यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागणीच्या घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. शेतकऱ्याची राख रांगोळी झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पाणी दौरा केला. पाहणी दौऱ्यामध्ये शेतात ते पण टाकून त्यावर सोयाबीन ठेवले. दंगल नियंत्रण पथकाच्या माध्यमातून रस्सी लावून बॅरिकेटिंग केली. साडेचार मिनिटांमध्ये मुख्यमंत्र्यांनी दौरा संपवला, अशी टीका कैलास पाटील यांनी केली.

राणा जगजित सिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का

भाजपा आमदार राणा जगजित सिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का दिला, अंबादास दानवे यांनी व्हिडीओ पोस्ट करत दावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळ पाहणी दौऱ्यावर असताना शेतकरी आपली व्यथा मांडायला जात असताना भाजपाचे आमदार राणा जगजितसिंग यांच्याकडून शेतकऱ्याला धक्का दिला.धाराशिव येथील कळंब तालुक्यातील मलकापूर येथे मुख्यमंत्री पाहणी करत असताना हा प्रकार घडल्याचा दावा दानवे यांनी केला.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद