AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : त्यांचं ठरलं आहे की..राज ठाकरेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया

Chandrashekhar Bawankule : "परिस्थिती वाईट आहे पण अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केला आहे की आमचं सरकार हे दुष्काळी परिस्थितीत समाजाला कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही"

Chandrashekhar Bawankule : त्यांचं ठरलं आहे की..राज ठाकरेंच्या आरोपांनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया
Chandrashekhar Bawankule
| Updated on: Sep 24, 2026 | 1:40 PM
Share

निवडणूक आयोगातील मतभेदाचा विषय चव्हाट्यावर आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर अन्य दोन सहआयुक्तांनी आक्षेप घेतले आहेत. यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. राज ठाकरे यांनी सुद्धा ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे असं म्हटलं आहे. त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलले आहेत. “त्यांचं ठरलं आहे की या संवैधानिक संस्था आहेत, त्यावर काहीतरी आरोप करायचे, काहीतरी नरेटीव सेट करणे, असे आरोप म्हणजे शिळी भाकरी वाटते” असं चंद्रशेखर बावनकुळे बोलले.

“इंडिया आघाडी जेव्हा पहिली तयार झाली, त्यात नवीन काय यांना केवळ निगेटिव्ह नरेटीव सेट करायचं असतं, राजस्थानच्या कोटामध्ये जाऊन गांधींनी नाटक केलं छात्र की गुंज घेतली, तिथे मात्र काँग्रेसचा पराभव झाला राहुल गांधी म्हणजे पराभव, मोदीजी म्हणजे विजय. जसा पराभव झाला तसा निवडणूक आयोग बोगस आहे, चुकीचा आहे असे आरोप करतात, पश्चिम बंगाल मध्ये पराभव झाला तर निवडणूक आयोग चुकीचा आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

दुष्काळाचा संपूर्ण आढावा घेणे

चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी काय उपायोजना केल्यात त्याचीही माहिती दिली. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या अध्यक्षतेखाली आमच्या अकरा सदस्य मंत्रिमंडळाची कॅबिनेट सब कमिटी तयार केली आहे, दुष्काळाचा संपूर्ण आढावा घेणे, जिथे जशी परिस्थिती आहे तश्या पद्धतीने दुष्काळाच्या उपाययोजना करणे. यापूर्वी दुष्काळात शासनाने काय निर्णय घेतला त्या निर्णयप्रमाणे दुष्काळी विभागासाठी काय करता येईल, पंचनामे अचूक झाले पाहिजे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

पिण्याचे पाणी वर्ष-दीड वर्ष कसं पुरेल याकडे लक्ष घातलं पाहिजे, जनावरांना चारा कसा मिळेल, रेशनचा अन्नधान्य कसं उपलब्ध करता येईल. या सर्व दुष्काळी उपाययोजना दुष्काळ बद्दलचे शासन निर्णय याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी, दुष्काळी परिसरात त्या उपाययोजना पोहोचतात की नाही याकरिता कॅबिनेट सबकमिटी आहे” असं बावनकुळे म्हणाले.

कमी पडू देणार नाही

“परिस्थिती वाईट आहे पण अशाही परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला आश्वस्त केला आहे की आमचं सरकार हे दुष्काळी परिस्थितीत समाजाला कुठेही त्या ठिकाणी कमी पडू देणार नाही, संपूर्ण उपाययोजना सरकार करेल. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी सबकमिटी बसणार आहे आणि या बैठकीत आठवड्याचा आढावा आम्ही घेणार आहोत, सदस्य सचिव हे सेक्रेटरी आहेत या समितीच्या माध्यमातून आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

Follow Us
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?