
Viral Video : गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच आता सोशल मीडियावर एका शाळेतील विद्यार्थिनींचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओमध्ये दोन शाळकरी मुली स्टेजवर टॉवेल परिधान करून डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर सुमारे 15 सेकंदांचा हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडिओमध्ये शाळेच्या कार्यक्रमादरम्यान काही विद्यार्थिनी स्टेजवर गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मात्र, त्या टॉवेलसारखे वस्त्र परिधान करून डान्स करत असल्यामुळे हा प्रकार वादग्रस्त ठरला आहे.
सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडिओ जीवन ज्योती मॉडेल स्कूलमधील एखाद्या कार्यक्रमाचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा व्हिडिओ नेमका कधी आणि कोणत्या कार्यक्रमादरम्यान शूट करण्यात आला याची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.
शाळा प्रशासनावर टीका
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक सोशल मीडिया युजर्सनी शाळा प्रशासनावर टीका केली आहे. काहींचे म्हणणे आहे की पालक आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार मिळावेत म्हणून शाळेत पाठवतात. अशा परिस्थितीत शाळांमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम किंवा डान्स सादर होणे योग्य नाही असे मत व्यक्त केले जात आहे.
दुसरीकडे काही लोकांनी या प्रकरणात संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की सोशल मीडियावर अनेकदा अपूर्ण माहिती किंवा संदर्भाशिवाय व्हिडिओ व्हायरल होतात. त्यामुळे संपूर्ण सत्य समोर येण्यापूर्वी कोणत्याही निष्कर्षावर पोहोचणे योग्य नाही.
इंग्लिश मीडियम स्कूल की फूहड़ता।
बच्चियों से टॉवल डांस करवाया जा रहा है।इस वीडियो को देखने के बाद देश का हर बाप शर्मिंदा होगा।
pic.twitter.com/H290w2NOwZ— Prof. इलाहाबादी ( نور ) (@ProfNoorul) March 14, 2026
व्हिडीओमागील सत्यता तपासण्याची गरज
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत जीवन ज्योती मॉडेल स्कूल प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे या व्हिडिओमागील नेमकी पार्श्वभूमी काय आहे याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही.
या घटनेमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काही जण या प्रकाराचा निषेध करत आहेत तर काही जण आधी सत्यता पडताळण्याची गरज असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये या प्रकरणाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.