
आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात फोन, लॅपटॉप, घराचे कुलूपही फिंगरप्रिंटने उघडतात. सुरक्षेच्या कारणास्तव अनेकजण अशाच गोष्टी वापरण्याला प्राधान्य देतात. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ‘टच आयडी ब्रा’ दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहून प्रश्न पडला आहे खरच अशी ब्रा तयार केली गेली आहे. व्हिडीओमध्ये या ब्राला हाय-टेक ‘अँटी-चीटिंग ब्रा’ असे म्हटले आहे, जी चुकीच्या बोटाचा ठसा आला तर उघडायलाच नकार देईल. व्हिडीओमागचे सत्य काय चला जाणून घेऊया…
व्हिडीओमध्ये काय दिसतं?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत ब्राच्या क्लॅस्पवर एक छोटं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस दिसतं. फोनसारखंच फिंगरप्रिंट स्कॅन होईपर्यंत ते पूर्ण लॉक राहतं. बरोबर ठसा लागला की क्लॅस्प आपोआप उघडतं. दिसायला अगदी खऱ्या स्मार्ट डिव्हाईसच्या डेमोसारखंच वाटतं.
हे खरंच प्रोडक्ट आहे का?
नाही! हे बाजारात विकायला येणारं प्रोडक्ट नाही आणि कोणत्याही कंपनीने याचा लॉन्च केलेला नाही. हे फक्त एक मजेशीर प्रोटोटाइप आहे, जे जपानमधील एका फँटसी इन्व्हेंटरने मनोरंजनासाठी बनवलंय. हे व्हायरल कॉन्सेप्ट जपानचे ZAWAWORKS अर्थात युकी आइजावा यांनी बनवलंय. ते स्वतःला ‘Delusion Inventor’ (स्वप्निल शोधक) म्हणवतात आणि असे मजेदार-अजब गॅजेट्स बनवून सोशल मीडियावर शेअर करतात.
🍌 From the creators of the chastity belt — Japan now has a bra with Touch ID
This cyber-bra unhooks only with a fingerprint.
The creator has been working on his invention for years. He says the new version of this anti-cheating device is much more compact and comfortable than… pic.twitter.com/mnWNqAaSDW
— NEXTA (@nexta_tv) November 28, 2025
2024 मध्ये त्यांनी X वर हा व्हिडीओ टाकला आणि लिहिलं, “चीटिंग थांबवण्यासाठी मी फिंगरप्रिंट रेकग्निशन ब्रा बनवली आहे!” हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. नंतर त्यांनी स्पष्ट केलं की हे फक्त एकच प्रोटोटाइप आहे आणि विकायचा काही विचार नाही. पण आता त्यांनी नवं व्हर्जन तयार केलंय आणि सांगितलंय की ते आधीच्यापेक्षा खूपच चांगलं काम करतंय.
सोशल मीडियावर का झाला वाद?
हा व्हिडीओ मजा म्हणून बनवला असला तरी अनेकांनी तो हलक्यात घेतलेला नाही. अनेकांनी याला स्त्रियांबाबत असंवेदनशील म्हटलं आणि सांगितलं की अशी कल्पना स्त्रियांना नियंत्रणात ठेवण्याची मानसिकता दाखवते. दुसरीकडे काहींनी याला फक्त एक मजेदार चिमटा मानलं आणि म्हणाले की टेक्नॉलॉजीच्या अतिरेकाच्या काळात असे कॉन्सेप्ट्स व्हायरल होणं आता सामान्य झालंय.