
आजकाल सोशल मीडियावर सतत काहीना काही व्हायरल होताना दिसते. कधी कधी सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ हे सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. तर कधी हे व्हिडीओ AIच्या माध्यमातून तयार केल्याचे कळते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये एक साप भगवान शंकराची आरती करताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी पाहिल्या पाहिल्या एडीट केलेला व्हिडीओ असे म्हटले आहे.
काय आहे व्हिडीओ?
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. या व्हायरल क्लिपमध्ये भगवान शिवाच्या मंदिरात एक साप आरती करताना दाखवण्यात आला आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंत, व्हिडीओत एक साप पेटत्या दिव्यांनी भरलेले आरतीचे ताट उचलून देवाची आरती करताना दिसतोय. पहिल्या नजरेतच हा व्हायरल व्हिडीओ इतका खरा वाटतो की कोणीही फसू शकतं. खरं तर हा एक AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तयार केलेला व्हिडीओ आहे, जो नेटिझन्सना विचार करायला भाग पाडतोय की AI खरंच हाताबाहेर चालले आहे.
काय आहे सत्य?
वास्तवात असे घडणे अशक्यच आहे. त्यामुळे हा व्हिडीओ तयार करण्यासाठी AIचा वापर केल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण ज्या प्रकारे हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे पहिल्यांदा पाहाताना जराही वाटणार नाही की तो AIच्या मदतीने तयार केला आहे. ‘सापाची आरती’ असं म्हणत ही व्हिडीओ क्लिप रेडिट, X (ट्विटर) तसेच इतर प्लॅटफॉर्मवर शेअर होताच तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या व्हिडीओवर लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
अनेक नेटिझन्स या व्हिडीओवर खूप मजेदार कमेंट्स करतायत आणि मीम्स बनवतायत. तर मोठ्या संख्येने लोक AI च्या या नव्या ताकदीबद्दल चिंता व्यक्त करतायत. कमेंट सेक्शनमध्ये लोक लिहितायत की AI आता कंट्रोलच्या बाहेर जात आहे. आता खरं आणि खोटं यात फरक करणं कठीण झालंय. टीव्ही ९ मराठी या व्हिडीओची पृष्टी करत नाही.