ऑनलाइन पार्सलवर लिहिला मजेदार पत्ता, बघून डिलिव्हरी बॉयची उडाली असेल झोप!

ही पोस्ट आतापर्यंत 94 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी ती लाइक केली आहे आणि शेकडो लोकांनी ही पोस्ट रिट्विटदेखील केली आहे.

ऑनलाइन पार्सलवर लिहिला मजेदार पत्ता, बघून डिलिव्हरी बॉयची उडाली असेल झोप!
online shopping
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 17, 2023 | 9:51 PM

आजचा जमाना ऑनलाइनचा जमाना आहे. विशेषत: वस्तू खरेदीच्या बाबतीत. आपल्याला जे काही खरेदी करायचे आहे, फक्त मोबाइलवरून ऑर्डर करा आणि वस्तू ऑनलाइन माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचते. आपल्याला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर तुम्हाला चांगले माहित असेल की, वस्तू खरेदी करण्याबरोबरच तुम्हाला कुठे ती वस्तू मागवायची आहे, याचा पत्ताही सांगावा लागेल. तसं पाहिलं तर एरवी लोक घराचा नंबर आणि काही लँडमार्क पत्त्यावर टाकतात, जेणेकरून डिलिव्हरी बॉयला पत्ता शोधण्यात अडचण येऊ नये, पण हल्ली सोशल मीडियावर अशा पत्त्याची एक पोस्ट व्हायरल होत आहे, जी पाहून लोक खूप हसत आहेत.

खरं तर पत्त्यावर अशा गोष्टी लिहिल्या जातात की वाचून कुणीही हसून वेडं होऊ शकतं. कदाचित हा पत्ता वाचून डिलिव्हरी बॉयनेही आपलं डोकं भिंतीवर आपटलं असावं. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लिपकार्टचे एक पार्सल आहे, ज्यावर इनव्हॉइस चिकटवलेले आहे.

राजस्थानमधील जोधपूर मध्ये असलेल्या या चलनामध्ये शिपिंग ॲड्रेस लिहिला आहे, पण हा पत्ता खूप लांब आणि रुंद लिहिलेला आहे. भिखाराम असे या मालाची ऑर्डर देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी लिहिले, ‘भिखाराम हरिसिंग नगर गिलाकोर. गावाच्या एक किलोमीटर पुढे माझे शेताचे गेट आहे. एक लोखंडी गेट आहे, त्याच्या जवळ एक छोटा दरवाजा आहे आणि गेटजवळ एक काळा मुंगिया आहे, तिथे येऊन फोन कर, मी येईन.” आता हा पत्ता वाचून लोकांना हसू येत नसेल तर दुसरं काय येणार. या माणसाने पत्ता नाही काहीतरी वेगळंच लिहिलंय.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @Nishantchant नावाच्या आयडीसह ही मजेशीर पोस्ट शेअर करण्यात आली असून मजेशीर अंदाजात कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘डिलिव्हरी करणारी व्यक्ती मरेपर्यंत त्याचा पत्ता लक्षात ठेवेल’. ही पोस्ट आतापर्यंत 94 हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे, तर 2 हजारांहून अधिक लोकांनी ती लाइक केली आहे आणि शेकडो लोकांनी ही पोस्ट रिट्विटदेखील केली आहे.